ताण दूर करण्यासाठी शहरात ३८ जलकुंभ प्रस्तावित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

नाशिक - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व दारणा धरणांत पुरेसा साठा आहे. पण पाणी वितरणाची अपुरी व्यवस्था व वाढत्या लोकसंख्येमुळे वितरणावरील ताण वाढत आहे. भविष्यातील गरज म्हणून पाणीपुरवठा विभागाने नव्याने ३८ जलकुंभ प्रस्तावित केले आहेत. अमृत योजनेतून शासनाने त्यासाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय तीस वर्षे पूर्ण झालेले सहा जलकुंभ पाडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नऊ जलकुंभांचे काम प्रगतिपथावर आहे.

शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठा व्यवस्थेवर होत आहे. शहराच्या गावठाण भागाला लागून मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती तयार होत असल्याने वर्षागणिक पाणीपुरवठ्याची सोय करावी लागत आहे. सध्या शहरात १०१ जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा होतो. नववसाहतींमुळे एका जलकुंभावर अनेक भागांचा भार अवलंबून आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या, वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी नवीन ३८ जलकुंभ प्रस्तावित करण्यात आले आहेत. अमृत योजनेतून मंजुरी मिळाल्यास वितरणातील त्रुटी मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होईल.

जलकुंभांना मिळणार जागा
नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या शहर विकास आराखड्यात सार्वजनिक सुविधेसाठी टाकण्यात आलेल्या आरक्षित जागांवरसुद्धा जलकुंभ बांधता येणार आहे. 
यापूर्वी एखाद्या जागेत जलकुंभ उभारायचा ठरल्यास त्यासाठी आधी जागेचे नियोजन करावे लागत होते; परंतु आता जागेची समस्या विकास आराखड्यातून दूर झाली 
आहे.

सहा जलकुंभ तोडणार
नाशिक रोड भागातील दुर्गा उद्यान, पंचवटी विभागातील लुंगे मंगल कार्यालय व जुने पंपिंग स्टेशन, सातपूर विभागातील म्हाडा कॉलनी, सिडको विभागातील पाथर्डी फाटा येथील जीएसआर, पूर्व विभागातील सादीकशाह अशा सहा जलकुंभांची वयोमर्यादा संपुष्टात आल्याने ते तोडले जाणार आहेत. सध्या गांधीनगर, द्वारका भागातील गोडेबाबानगर, पांडवनगरी, वासननगर, इंदिरानगर येथील भवानीमातानगर व लव्हाटेनगर अशा एकूण नऊ जलकुंभांचे काम प्रगतिपथावर आहे.

Web Title: nashik news water issue