खूशखबर! दिवाळीत अतिरिक्त पाणीपुरवठा

खूशखबर! दिवाळीत अतिरिक्त पाणीपुरवठा

नाशिक - शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर व दारणा धरण शंभर टक्के भरले असताना कमी-अधिक प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शिवसेनेने दोनवेळा पुरवठा करण्याच्या मागणीकडे सत्ताधारी भाजपने दुर्लक्ष केले असले, तरी दिवाळीत नाशिककरांना दिलासा दिला आहे. शहरात सध्या ४३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्याऐवजी दिवाळीत साडेचारशे दशलक्ष लिटरपर्यंत पुरवठा केले जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

यंदा गंगापूर व दारणा धरणक्षेत्रात प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे शहरात दोनवेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली होती. भाजपला जायकवाडी धरणाची काळजी असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे शिवसेनेने आरोप करून पाणीप्रश्‍नाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला होता. महापौर भानसी यांनी स्पष्टपणे शिवसेनेच्या मागणीला नकार दिला. पुरेसा पाणीपुरवठा होत असून, सर्वेक्षण करून गरज पडल्यास दोनवेळा पाणी पुरवठा केला जाईल किंवा नवीन धोरण आखण्याचा निर्णय जाहीर केला होता.

पाणी वाढविण्यात आले
शहराला दररोज ४१० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सध्या पाण्याचा वापर ४३० दशलक्ष लिटरपर्यंत वाढला आहे. दिवाळीमधील पाण्याची गरज ओळखून त्यात आणखी पंधरा ते वीस दशलक्ष लिटर पाणी वाढविण्यात आले आहे. दिवाळीचा कालावधी पूर्ण होईपर्यंत साडेचारशे दशलक्ष पाणीपुरवठा केला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com