व्हॉट्‌सॲप हॅकिंगप्रकरणी राजस्थानमधून एक ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

नाशिक - शहरातील प्रसिद्ध डॉक्‍टर, मॉडेलिंग क्षेत्रातील व्यक्तींसह उद्योजकांचे व्हॉट्‌सॲप अकाउंट हॅक केल्याप्रकरणी नाशिकच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधून आज (ता. २) एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात ३० तक्रारी दाखल झाल्या आहेत.

सायबर पोलिसांनी अनोळखी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या बुधवारी सायकलिस्ट असोसिएशनच्या डॉ. मनीषा रौंदळ यांचे व्हॉट्‌सॲप हॅक झाले होते. हॅकर त्यांच्या नावाने अश्‍लील संदेश, व्हिडिओ क्‍लिप्स पाठवून धुमाकूळ घातला होता. डॉ. रौंदळ यांनी आपला मोबाईल व्हॉट्‌सॲप बंद करून ठेवला होता, तरी हॅकरचे उद्योग सुरू होते. 

डॉ. सारिका देवरे यांच्या बाबतीतही असेच घडले आहे. हॅकरने महिलांचे व्हॉट्‌सॲप अकाउंट टार्गेट केले होते. हॅकरच्या उपद्रवामुळे शहरातील डॉक्‍टर, मॉडेल, खेळाडू, उद्योजक, विद्यार्थी हैराण झाले होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या जनजागृतीमुळे या प्रकाराला आळा बसला.

Web Title: nashik news Whatsapp hacking case