राज्यात 20 जानेवारीपासून वन्यजीव गणना 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

नाशिक - राज्यात 20 जानेवारीपासून वन्यजीवांची गणना केली जाणार आहे. या वेळी वन विभागाकडून प्रथमच वन्यजीव गणनेसाठी ऍप व वेगळ्या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असून, ही गणना मांसाहारी व तृणभक्षी अशा दोन टप्प्यांत होणार आहे. 

दरवर्षी पानवठ्याजवळ येणाऱ्या प्राण्यांची, तर दर चार वर्षांनी जंगलातील वन्यजीवांची गणना केली जात असते. 20 जानेवारीपासून होणाऱ्या गणनेअंतर्गत थेट जंगलाक्षेत्रात जाऊन पहिले तीन दिवस मांसभक्षी, तर उर्वरित तीन दिवस तृणभक्षी प्राणी मोजले जाणार आहेत. यामधून किती प्रकारच्या प्राण्यांचे अस्तित्व आहे, त्यांची संख्या किती, याची माहिती उपलब्ध होणार आहे. 

वन विभागातर्फे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन देण्यात येत आहे. यात वन्यजीवांची ओळख कशी करायची, त्याचे क्षेत्र कुठले आहे. पायांचे ठसे, विष्ठा यावरून वन्यजीवांची ओळख कशी करावी, अशी माहिती दिली जात आहे. त्याचप्रमाणे जंगलक्षेत्रांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. 

गणनेला तंत्रज्ञानाची जोड 
वन विभागामार्फेत "इकोलॉजिकल सेन्सेक्‍स' हे ऍप विकसित करण्यात आले असून, ते प्रत्येक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या ऍपमध्ये गणनेदरम्यान मिळालेली माहिती, वन्यप्राण्यांचे फोटो, पायांचे ठसे आदी माहितीची नोंद होणार असून, ही माहिती कायमस्वरूपी संकलित केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांची सद्यःस्थितीची याऍपद्वारे विभागाला समजू शकणार आहे. 

Web Title: nashik news Wildlife computation