‘ते’ मद्याचे दुकान पंचवटीत सुरू करण्याचा घाट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

पंचवटी - महामार्गापासून ५०० मीटरच्या आत दुकान येते म्हणून जिल्हा यंत्रणेने बंद केलेले मद्याचे दुकान नवीन तिडके कॉलनीच्या लंबोदर ॲव्हेन्यू अपार्टमेंटच्या गाळ्यात स्थलांतरित झाल्याने तेथील रणरागिणींनी त्याला ठाम विरोध केला. त्यामुळे तेच दुकान पुन्हा जुन्या जागी आल्याचे लक्षात येताच आज तेथील नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून बंद केलेले मद्याचे दुकान पुन्हा कसे सुरू झाले? अशी विचारणा केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पेठ रोड भागातील मोती सुपर मार्केट भागातील तरुण सुखवाणी यांचे हिरा वाइन्स दुकान बंद झाले. त्यानंतर हे दुकान नवीन तिडके कॉलनीतील लंबोदर ॲव्हेन्यू या इमातीत भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका गाळ्यात सुरू होणार होते. मात्र, इमारतीतील नागरिकांनी या वाइन शॉपला कडाडून विरोध केला. त्या भागातील महिला प्रथमच थेट रस्त्यावर उतरल्या. दुकान मालकाने ट्रकमध्ये आणलेले मद्याचे खोके थेट रस्त्यावर फेकून देत महिलांनी तीव्र आंदोलन केले. या रणरागिणींनी थेट संरक्षण राज्यमंत्र्यांना साकडे घातले. मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर जिल्हाधिकाऱ्यांपासून सगळीच यंत्रणा खडबडून जागी झाली. दुकानदाराला नमते घ्यावे लागले. वादावर तात्पुरता पडदा पडला असतानाच आज संबंधित दुकान पुन्हा जुन्या पेठ रोडवरील मोती सुपर मार्केटमधील गाळ्यात दुपारी सुरू होत असल्याचे लक्षात येताच, स्थानिकांनी आक्रोश केला. दुपारी मद्याचा ट्रक उतरवला जात असताना, हा रस्त्यापासून ५०० मीटरचा भंग असल्याची तक्रार करीत, मद्याचे बॉक्‍स उतरविण्यास विरोध दर्शवला. पण दुकानातील कर्मचाऱ्यांनी थेट जिल्हा यंत्रणेच्या परवानगीनेच हे दुकान पुन्हा सुरू करणार असल्याचा खुलासा केल्याने नागरिक आणखीच संतापले. 

आधी रस्त्यापासून ५०० मीटरच्या आत येते म्हणून बंद केले. त्यानंतर तिडके कॉलनीत तेथील नागरिकांनी विरोध केला म्हणून बंद करता. मग पुन्हा जुन्याच जागेवर पूर्ववत करून आमच्यावर अन्याय का? आमच्या विरोधाची दखल न घेतल्यास विभागीय आयुक्तांकडे तक्रार करू.
- किरण भालेकर, रहिवासी

तीव्र आंदोलनाचा इशारा
जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देत दारू दुकान पुन्हा सुरू झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. नरेश पाटील, किरण भालेकर, राजेंद्र वैश्‍य, बाबूभाई पटेल, राहील शेख, राजन गुप्ता, धमेंद्र गुप्ता, प्रतिभा भालेकर, अलका पटेल, विलास पटेल, आर. सी. पटेल व महिलाही उपस्थित होत्या. 

Web Title: nashik news wine shop 500 meters from the highway