महिला सुरक्षिततेवर मंथनाने गौराईचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

नाशिक - महिलांना सक्षम करण्यासाठी कायदे अस्तित्वात आहेत. मात्र अशाही स्थितीत ती असुरक्षित आहे. तिची सुरक्षा तिनेच करणे आता काळाची गरज बनली आहे. या असुरक्षित महिलेच्या स्वरक्षणा संदर्भात गौराईच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला विचारमंथन करण्यात आले. ‘ती’ला स्वरक्षणासाठी लाठीही देण्यात आली. या विश्‍वासाला जोड दिली, ती महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता सिंगल यांनी. 

नाशिक - महिलांना सक्षम करण्यासाठी कायदे अस्तित्वात आहेत. मात्र अशाही स्थितीत ती असुरक्षित आहे. तिची सुरक्षा तिनेच करणे आता काळाची गरज बनली आहे. या असुरक्षित महिलेच्या स्वरक्षणा संदर्भात गौराईच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला विचारमंथन करण्यात आले. ‘ती’ला स्वरक्षणासाठी लाठीही देण्यात आली. या विश्‍वासाला जोड दिली, ती महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता सिंगल यांनी. 

महिला व बालविकास विभाग व नाशिक पोलिस आयुक्तालयातर्फे दादासाहेब गायकवाड सभागृहात ‘महिला सुरक्षितता व स्वसंरक्षण आणि सायबर जागृती’ याविषयी कार्यशाळा झाली. त्यात सौ. सिंगल प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, नमिता कोहोक, मंजूषा चौघुले आदी उपस्थित होते. सुरवातीला महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर महिलांना स्वसंरक्षणासाठी पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांच्या हस्ते पोलिस लाठ्यांचे वाटप करण्यात आले. आमदार प्रा. देवयानी फरांदे म्हणाल्या, की महिलांच्या संरक्षणासाठी पोलिस तत्पर असतात. पण महिलांना महिलांकडूनच अन्याय-अत्याचाराला सामोरे जावे लागते यावर प्रकाश टाकला.

मुलांकडून सोशल मीडियाची माहिती घ्या
पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी, अलीकडे समाजात लहान वयातील मुला-मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. यामागे पालकांचा मुलांशी तुटलेला संवाद असल्याचे सांगत, सोशल मीडियावर वावरत असताना मुलांना त्याची माहिती दिली पाहिजे किंवा ते सोशल मीडियाचा वापर कशासाठी करतात, याची माहिती घेतली पाहिजे. गेल्या वर्षी १३७ मुली बेपत्ता झाल्या. पोलिसांनी मेहनत घेऊन १३१ मुलींचा शोध घेतला. यंदाही १०० मुली बेपत्ता असून, ८२ मुलींचा शोध घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदवाळकर व सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले.

मंजूषा चौघुले यांनी दिले स्वसंरक्षणाचे धडे
गर्दीच्या ठिकाणी वावरताना नेहमीच महिलांना नको त्या स्पर्शांना वा टवाळखोरांचा त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी महिलांनी स्वसंरक्षण करण्यासाठीचे प्रात्यक्षिकच मंजूषा चौघुले यांनी करून दाखविले. पुरुषी मानसिकता असलेल्यांना वठणीवर आणण्यासाठी महिलांनी बळाचा वापर न करता क्‍लृप्त्यांचा वापर केला तरी आपले स्वसंरक्षण होऊ शकते, असेच त्यांनी प्रात्यक्षिकातून दाखवून दिले. नाशिकमध्ये झालेली ही कार्यशाळा आगामी काळात राज्यात विभागवार घेणार असल्याचे श्रीमती सिंगल यांनी सांगितले.

Web Title: nashik news women