कीटकनाशक फवारणीमुळे सिन्नरमध्ये महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

नाशिक  - मुसळगाव येथे शेतामध्ये कीटकनाशक फवारणी केल्यानंतर घरी आलेल्या 55 वर्षीय महिलेला त्रास होऊ लागला. त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला. केशरबाई लक्ष्मण गायकवाड (वय 55, रा. मुसळगाव, ता. सिन्नर) असे महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशरबाई गायकवाड यांनी गेल्या 17 तारखेला शेतामध्ये नोवॉन नामक कीटकनाशकाची फवारणी केली. त्यानंतर त्या घरी आल्या असता त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक येथील वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: nashik news women death by Pesticide spraying