जेल रोडला लोखंडी मुसळीने पत्नीचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

नाशिक, जेल रोड - जेल रोड परिसरातील शिवरामनगर येथे रात्री गांधीनगर मुद्रणालयाचे कामगार अण्णासाहेब निवृत्ती गायखे याने मद्याच्या नशेत पत्नी सविता गायखे यांच्या (वय ४५) डोक्‍यात मुसळी मारून निर्घृण खून केल्याची घटना घडली. या वेळी आईच्या मदतीला धावलेल्या मुला- मुलीलाही गायखे याने मुसळीने मारून जखमी केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरामनगर येथील अपूर्वा कॉलनीमध्ये बंगल्यात गायखे कुटुंबीय राहतात. रात्री गायखे कुटुंबीय टीव्ही पाहात होते, तर मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेली मुलगी धनश्री 
(वय २२) आपल्या खोलीमध्ये होती. त्याच वेळी मद्यधुंद असलेल्या संशयित अण्णासाहेब गायखे याने स्वयंपाकघरातून लोखंडी मुसळी आणून पत्नी सवितावर हल्ला करून निर्घृण खून केला. आरडाओरडमुळे गांधीनगर मुद्रणालयात आंतरवासिया म्हणून कार्यरत असलेला मुलगा अजिंक्‍य (वय २४) व मुलगी धनश्री बैठकखोलीत धावत आले, तर संतप्त गायखेने मुलगा अजिंक्‍यवरही मुसळीने हल्ला करून गंभीर जखमी केले. नंतर गायखे धनश्रीकडे वळले आणि तिलाही जखमी केले. मात्र शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेत तिला वाचवून संशयित गायखेला पकडले. 

घटनेची माहिती कळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन बंगल्यातून अण्णासाहेब गायखे यास अटक केली, तर जखमी अजिंक्‍य व धनश्री यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, संशयित अण्णासाहेब गायखे पोलिस कर्मचाऱ्याचा भाऊ असल्याची चर्चा रुग्णालयात होती.

Web Title: nashik news women murder