कांदा दरामध्ये 600 रुपयांची घसरण...

संतोष विंचू
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

"आज सर्वत्रच भावात घसरण झालेली दिसून आली बांगलादेश सीमेवरील तीन ठिकाणी सीमा बंद असल्याने फक्त एकाच ठिकाणाहून कांदा निर्यात होत आहे त्यातच कांदा आवक वाढीस लागल्याने भाव उतरत आहेत आज व्यापारी काही वेळ चहा पिण्यासाठी गेले त्याचदरम्यान लिलाव बंद असल्यामुळे आणि भाव उतरल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर जाऊन रास्ता रोकोचा प्रयत्न केला"
- डी सी खैरनार सचिव

कांदा भाव कमी पुकारल्याने शेतकरी उतरले रस्त्यावर

येवला (नाशिक) : थांबवलेले लीलाव आणि सोबतच कांद्याच्या दरात झालेली सहाशे रुपयांची घसरण यामुळे आज (बुधवार) दुपारी साडेतीन वाजता येथील बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

निर्यातमुल्य हटवून ते शून्यावर आणल्यावर कांद्याच्या घसरलेल्यादरातील उसळी ही अल्पकालीन ठरली आहे. सोमवार, मंगळवारी असलेली तेजी बुधवारी पुन्हा ६०० रुपयांनी कमी होऊन कांद्याचे दरमागील आठवड्याच्या १५००  ते १८०० रुपयांच्या पातळीवर येऊनराहील्याने बुधवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान काही संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करीत येवला मनमाड राज्यमहामार्गावरील वाहतुक थांबवून ठेवली होती. वाहतुक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून हा रास्तारोको थांबवला.

मागील आठवड्यात शुक्रवारी रात्री केंद्र शासनाने कांद्यावरीलनिर्यातमुल्य हटवून ते शून्यावर आणले. या निर्णयामुळे मागील आठवड्यामध्ये १५०० ते १७५० च्या आसपास असलेल्या कांद्याच्या दराने या आठवड्यात सोमवारपासून उसळी घेत २५०० ते २६००रुपयांची उच्चतम पातळी गाठली होती. मात्र, कांद्याच्या दरातील ही वाढ अल्पकालीन ठरली. बुधवारी कांद्याचे लिलाव सुरु होताच जास्तीत जास्त भाव १८७५ रुपये क्विंटल होते. त्यात एका कांद्याला ९०० रुपये क्विंटलपर्यंत भाव पुकारला गेल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करीत आपला संताप व्यक्त केला. आज जास्तीत जास्त दर १८७५  च्या आसपास दिसून आले तर सरासरीमध्ये १७०० रुपये प्रतिक्विंटल दर होते.

सकाळच्या सत्रात सरासरी एक हजार सातशे ७५ रुपयांपर्यंत तर सर्वाधिक एक हजार आठशे पंचाहत्तर रुपये भाव मिळाला मात्र दुपारच्या लिलावात यात अजून दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी आक्रमक झाले.याच दरम्यान व्यापाऱ्यांनी चहापाण्यासाठी काही मिनटे लीला थांबवल्याने शेतकरी अजूनच आक्रमक होत नगर मनमाड महामार्गाकडे जाऊन धनी घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली सुमारे १० ते मिनीट हे आंदोलन सुरू असतानाच तिकडे व्यापाऱ्यांनी लिलाव देखील पूर्ववत केले होते.आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याने पोलिसांची गाडी तत्काळ घटनास्थळी दाखल झाली यादरम्यान शेतकऱयांची पळापळ झाल्याने आंदोलन मोडीत निघाले.मात्र मागील दोन दिवसांच्या तुलनेत बाजारभावात सहाशे ते आठशे रुपये घटल्याने सर्वच शेतकऱ्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखविली.या आंदोलनात प्रभाकर भोसले नीलेश खुदा सांगड शरद कुदळ शांताराम कुदर यांच्यासह शंभरावर शेतकरी सहभागी झाले होते.

Web Title: nashik news yeola onion rate farmer rasta roko