ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके ’जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

संतोष विंचू
बुधवार, 24 जानेवारी 2018

येवला (नाशिक): व्यंगचित्रकारसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती निमित्ताने कार्टुनिस्ट कंबाइन आयोजित अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्यप्रदर्शनात रविवारी ज्ञानराज सभागृह ठाणे येथे मनसे अध्यक्ष, व्यंगचित्रकार राज ठाकरे यांचे हस्ते येवल्यातील ज्येष्ठ व्यंगचित्रकार तथा समाजसेवक प्रभाकर झळके यांना ’जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपिठावर ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, संमेलनाध्यक्ष विवेक मेहेत्रे, राजेश मोरे, स्थानिक नगरसेविका रुचिता मोरे, पितांबरी कंपनीचे विश्‍वास दामले, रवींद्र बाळापुरे, महेंद्र भावसार आदी मान्यवर उपस्थित होते.

येवला (नाशिक): व्यंगचित्रकारसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती निमित्ताने कार्टुनिस्ट कंबाइन आयोजित अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्यप्रदर्शनात रविवारी ज्ञानराज सभागृह ठाणे येथे मनसे अध्यक्ष, व्यंगचित्रकार राज ठाकरे यांचे हस्ते येवल्यातील ज्येष्ठ व्यंगचित्रकार तथा समाजसेवक प्रभाकर झळके यांना ’जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपिठावर ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, संमेलनाध्यक्ष विवेक मेहेत्रे, राजेश मोरे, स्थानिक नगरसेविका रुचिता मोरे, पितांबरी कंपनीचे विश्‍वास दामले, रवींद्र बाळापुरे, महेंद्र भावसार आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रभाकर झळके यांनी गेल्या सहसहा दशकांत ५ सहस्त्राहुन जास्त व्यंगचित्र चितारली असुन अनेक दिवाळी अंकात ती प्रमुख आकर्षण असतात. चौफेर निरीक्षण, घडणार्‍या घटनांचा व बदलणार्‍या मुल्यांचा वेध घेणारे संवेदनशिल मन, अत्यंत मार्मिक व अभिजात विनोदबुद्धी झळके यांच्यात असल्याचा प्रत्यय त्यांचे प्रत्येक चित्रातुन प्रतिबिंबित होत असतो. कुंचल्यावरील असामान्य हुकूमत आणि सुवाच्च अक्षरलेखन यामुळे झळके यांची व्यंगचित्रे अर्थपुर्ण ठरत आली आहेत. या कलेसोबतच झळके हे धडपड मंच या संस्थेच्या माध्यातुन समाजसेवेत अविश्रांत कार्यरत आहेत. उत्कृष्ट वक्ता म्हणुनही त्यांची ओळख असुन आज वयाच्या ८० व्या वर्षीही लोकरंजनातुन लोकशिक्षण व लोकशिक्षणातुन लोकप्रबोधन करत त्यांचा सुरु असलेला या अखंड प्रवासाला मानाचा मुजरा करुन झळके यांना हा ’जीवनगौरव’ पुरस्कार दिला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्यदर्शन प्रदर्शन शनिवार २० व रविवार २१ जानेवारी रोजी ठाण्यात रंगले. या संमेलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे व्यंगचित्रकार म्हणून उपस्थित होते.

यावेळी उपस्थित व्यंगचित्रकारांना उद्देशुन राज ठाकरे म्हणाले की, 'तुम्हाला एखादी गोष्ट पटत नाही, तिथे प्रहार करा, प्रत्येक व्यंगचित्रकाराने त्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, योग्य भूमिका घेतली पाहिजे. माझे काम मी बजावतोय. तुम्हाला जे म्हणायचे आहे ते व्यंगचित्रातून दाखवा. तुम्ही जगभर पोहोचत आहात. सर्व परिस्थितीवर तुम्ही भूमिका घ्यावी, ती कठोर, कडवट घ्यावी. आताची परिस्थिती अशी आहे की, सरकारच्या बाजूने लिहिले की भक्त आणि विरोधात लिहिले की देशद्रोही समजले जाते. व्यंगचित्रकारांनी जे चुकते ते दाखविले पाहिजे आणि योग्य त्याचे कौतुक झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज ठाकरे यांनी ठाण्यात केले. व्यंगचित्रकला सर्वसामान्यांध्ये रुजणे याचा लंडन येथे आलेला स्वानुभव राज ठाकरे यांनी या वेळी कथन केला. प्रत्येक जण व्यंगचित्रकार होऊ शकतो असे नाही, परंतु ही कला मुरण्यासाठी व्यंगचित्रकारांनी प्रयत्न केले पाहिजे, तसेच ज्यांना हौस आहे, त्यांनी या कलेत आले पाहिजे, असे सांगत व्यंगचित्रातील ताकद वाढो आणि वृद्धिंगत होवो, अशा सदिच्छा दिल्या.'

अध्यक्षीय भाषणात मेहेत्रे म्हणाले की, 'व्यंगचित्रकारांना साहित्यिकाचा दर्जा द्यावा, असे १०० वर्षांनंतरही कोणाला वाटत नाही. मराठीतील उत्तम खपाच्या दिवाळी अंकांमध्ये विनोदी अंकांचे स्थान वरचे आहे, ज्यामध्ये अनेक हास्यचित्रे रसिकांचे मनोरंजन करीत आहेत. ही परंपरा फार वर्षांपासून असूनही साहित्य संमेलनातील कार्यक्रमांच्या व्यासपीठांवर व्यंगचित्रकारांना निमंत्रण नसते. चित्रकार, नवचित्रकार, स्थापत्य रचनाकारही अजूनही व्यंगचित्रकारांना आपल्या सोबत घेत नाहीत, त्यामुळे व्यंगचित्रकारांची स्थिती ’ना घर का ना घाट का’ अशी झालेली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्या मुलांनी सिनेनट, खेळाडू, राजकारणी, आय.ए.एस. अधिकारी किंवा बिल्डर व्हावे, असे पालकांना वाटते, पण त्याचे हास्य-व्यंगचित्रकार होऊन उत्तम नाव व भरपूर पैसा मिळवावा, असे वाटत नाही, अशी नाराजीही मेहेत्रे यांनी व्यक्त केली.'

डिजीटल युगामुळे व्यंगचित्रकलेला वाटा मोकळ्या झालेल्या आहेत. प्रभाकर झळके हे अंर्तब्राह्य शांत माणुस असून त्यांचा सन्मान हा योग्यच आहे, असे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणिस यांनी यावेळी सांगीतले.

Web Title: nashik news yeola veteran cartoonist prabhakar zalke honored jivan gaurav award