राहुल, अजिंक्‍य, काजल, राजश्री, योगेश ठरले ‘यिन’चे नवे शिलेदार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

नाशिक - ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) च्या नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत पाच महाविद्यालयांत राबविलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. राहुल भालेराव, काजल घोडेराव, अजिंक्‍य देशमुख, राजश्री कचरे हिच्यासह सर्वाधिक मताधिक्‍यांसह योगेश शिंदे याने बाजी मारली. ‘यिन’च्या या नव्या शिलेदारांसह मित्रांनी निवडीचा जल्लोष केला. 

वडनेरभैरव महाविद्यालयात उत्तम चव्हाण, राहुल भालेराव, संजीवनी पवार यांच्यात तिरंगी लढत झाली. त्यात राहुल भालेरावला अधिक मते मिळाल्याने विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून त्याची निवड झाली. अंदरसूलला एमएसजीएस महाविद्यालयात काजल घोडेराव व प्रीती सोनवणे यांच्यात काजल घोडेराव हिने बाजी मारली. येवल्याला स्वामी मुक्‍तानंद महाविद्यालयात अजिंक्‍य देशमुख व विलास धांद्रे यांच्यात अजिंक्‍य देशमुख याने जास्त मते मिळवत निवड निश्‍चित केली. कला व वाणिज्य महाविद्यालय (एसएनडी), येवला येथे सागर वाघ व राजश्री कचरे यांच्यात अवघ्या काही मतांच्या फरकाने सागरला पराभव पत्कारावा लागल्याने राजश्री कचरे हिची ‘यिन’ प्रतिनिधी म्हणून निवड झाली. निफाडला केजीडीएम महाविद्यालयात योगेश शिंदे याने विजय मिळवला. प्रतीक घायाळ याच्याशी लढत देताना योगेशने मोठ्या फरकाने विजय मिळविला.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा. डॉ. जयश्री जाधव या होत्या. मतमोजणीत प्राची जगताप, सायली काळे, भैरवी सरदेशमुख, समाधान घंगाळे, रोशन मेदगे, योगेश भारंबे, सोनाली बोरसे, गणेश साळी यांनी सहभाग घेतला. ‘यिन’च्या शॅडो कॅबिनेटचे अर्थमंत्री तेजस पाटील, पालकमंत्री जनार्दन धनगे, केबीटी महाविद्यालयाचा ‘यिन’ समन्वयक संतोष मुंढे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: nashik news yin election result