'विद्यार्थ्यांना मिळाली नवी दिशा, नवे बळ'

'विद्यार्थ्यांना मिळाली नवी दिशा, नवे बळ'

नाशिक - ‘यिन लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’अंतर्गत ‘सकाळ’ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व एपीग्लोबालेचे चेअरमन अभिजित पवार यांनी काल गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रक्षेपण जिल्हा व शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये करण्यात आले. शहरातील सपकाळ नॉलेज हब, ब्रह्मा व्हॅली आणि एसव्हीकेटी महाविद्यालयांमधील प्राचार्य, विद्यार्थी व प्राध्यापकांनी ऑनलाइन मार्गदर्शन घेतले. या संवादामुळे विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास प्राचार्यांसह विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. मार्गदर्शन ऐकताना विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला.

ब्रह्मा व्हॅलीतील विद्यार्थ्यांनी घेतले ऑनलाइन मार्गदर्शन
रावसाहेब थोरात सभागृहात ‘सकाळ’ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व एपीग्लोबालेचे चेअरमन अभिजित पवार यांच्या ‘यिन लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’चे थेट प्रक्षेपण आज अंजनेरीच्या पायथ्याशी असलेल्या ब्रह्मा व्हॅलीच्या कॅम्पसमध्ये करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. प्राचार्यांसह विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन घेतले.

यिन लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राममुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यास मदत मिळणार असून, समाजातील चांगल्या व आर्थिक गोष्टींचे नियोजन करणारे नेतृत्व तयार व्हावे. जेणेकरून रोजगारांची संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.
- सी. के. पाटील, प्राचार्य, ब्रह्मा व्हॅली

या कार्यक्रमाबद्दल अनेक वेळा ऐकले होते, पण आज कॅम्पसमध्ये  ‘सकाळ’ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व एपीग्लोबालेचे चेअरमन अभिजित पवार यांचे ऑनलाइन मार्गदर्शन ऐकले आणि माझ्या अनेक शंका दूर झाल्या. मला यातून मार्ग निवडण्यास मदत होईल, अशी आशा आहे.
- गायत्री पांडे, विद्यार्थिनी

****************************************************

‘एसव्हीकेटी’त विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
‘यिन लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या ऑनलाइन प्रक्षेपणाद्वारे मार्गदर्शन घेण्यासाठी श्रीमती विमलाबेन खिमजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती. ‘सकाळ’ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व एपीग्लोबालेचे चेअरमन अभिजित पवार यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी विद्यार्थ्यांत उत्सुकता होती. विद्यार्थ्यांनी भारत आणि इस्राईल देशातील शिक्षणपद्धतीमधील फरक समजून घेतला.


महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणाचा विकास व्हावा, त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण व्हावा, त्यांचा व्यक्तिमत्त्वविकास व्हावा यासाठी या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना लाभ होईल. 
- डॉ. विजय मेधने, प्राचार्य, एसव्हीकेटी 

तरुण महाविद्यालय स्तरावर संघटित करणे, त्यांना बदलत्या शिक्षणव्यवस्थेची माहिती करून देणे व उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे काम ‘सकाळ’ माध्यम समूह करीत आहे.  
    - स्नेहल बोरस्ते, संगणक विभागप्रमुख 

अभिजित पवार यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले. भारतामधील शिक्षणपद्धतीत आवश्‍यक बदल केला, तर विद्यार्थ्यांमधील उपजत गुणांना वाव मिळेल, असा संदेश आजच्या कार्यक्रमाने दिला.
-  विकास कुचेकर, विद्यार्थी 

अभिजित पवार यांनी भारत आणि इस्राईलमधील शिक्षणपद्धती समजून सांगितली. यामुळे दोन्ही देशांतील शिक्षणामधील नेमकी तफावत कळली. विद्यार्थ्यांना निश्‍चित प्रेरणा मिळाली.  
- हर्षदा ढोकणे, विद्यार्थिनी

****************************************************

सपकाळ नॉलेज हबच्या विद्यार्थ्यांत संचारला उत्साह
‘सकाळ’ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व एपीग्लोबालेचे चेअरमन अभिजित पवार यांच्या ‘यिन लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’चे थेट प्रक्षेपण आज सपकाळ नॉलेज हबच्या कॅम्पसमध्ये करण्यात आले. या वेळी प्राचार्य एस. बी. बागूल यांनी ‘सकाळ’च्या ‘यिन’कडून महाविद्यालयात सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांबाबत माहिती दिली. विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांनी ‘फेसबुक’वरील ऑनलाइन मार्गदर्शन ऐकले.

‘सकाळ’ माध्यम समूह नेहमीच विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देतो. विद्यार्थ्यांत नेतृत्वगुण विकसित व्हावेत यासाठी सुरू केलेला ‘यिन लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’ सुंदर असून, भावी पिढीला जीवनाची दिशा मिळेल.
- एस. बी. बागूल, प्राचार्य, सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालय

‘सकाळ’ माध्यम समूहाने सुरू केलेल्या ‘यिन डेव्हलपमेंट लीडरशिप प्रोग्राम’बाबत ‘सकाळ’ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व एपीग्लोबालेचे चेअरमन अभिजित पवार यांचे मार्गदर्शन ऐकल्यावर माझ्यासारख्या अनेकांचे भविष्य घडेल, अशी आशा विद्यार्थ्यांत निर्माण झाली आहे. 
- रोहित गायकवाड, विद्यार्थी, सपकाळ नॉलेज हब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com