कर्तबगार युवारत्‍नांना नाशिक ‘यिन’चा सलाम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

आपापल्या क्षेत्रात योगदान देत असताना नाशिकचे नाव राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचविणाऱ्या तसेच या माध्यमातून नाशिकच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा सत्कार करण्यात आला. 

कला व सांस्कृतिक क्षेत्रातून कथकच्या विशारद अदिती पानसे, युवा प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेच्या सदस्या अमृता पवार यांच्यासह क्रिकेटपटू मुर्तुझा ट्रंकवाला, सत्यजित बच्छाव, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातून मानस गाजरे, सामाजिक कार्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, तर यशस्वी स्टार्टअपसाठी प्रीतेश वैश्‍य यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. सह्याद्री ॲग्रो फार्मचे प्रमुख विलास शिंदे, स्पेक्‍ट्रम ॲकॅडमीच्या संचालिका मनीषा पवार, ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, ‘यिन’चे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अगदी लहानपणापासून नृत्याशिवाय मी दुसरे काहीच केले नाही. जे काही पर्यटन केले तेही फक्‍त नृत्यासाठीच. राष्ट्रीय शिष्यवृत्तीत मिळालेल्या अव्वल क्रमांकाच्या आठवणी आजही आनंद देतात. -अदिती पानसे

एकदा प्रवास करताना जेवणाविषयी अनुभवलेल्या समस्येवरून चांगले अन्न पुरविण्याची संकल्पना सुचली. त्यावर काम केले. आज ३०० रेल्वेस्थानकांसह काही विमानतळांवरही सेवा पुरवतोय. -प्रीतेश वैश्‍य

पुरस्कार मिळाल्याबद्दल मी निःशब्द झालो आहे. कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी हवी. कुठल्याही क्षणी हार मानायला नको.
-सत्यजित बच्छाव

पुरस्कार मिळाल्याने आनंद होतोय. क्रीडा क्षेत्रासह अन्य कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचे असेल तर कष्टाबरोबर योग्य दिशेने प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते.
-मुर्तुझा ट्रंकवाला

पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढल्याची जाणीव आहे. राजकारणाविषयी युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा. राजकारणात लिंगभेद नसून, युवतींनाही समान संधी उपलब्ध आहेत.-अमृता पवार

Web Title: nashik news YIN youth nashik sakal