युवा शिबिरात स्वयंसेवकांची हेळसांड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

नाशिक - सटाणा येथे  सुरू झालेल्या नेहरू युवा केंद्राच्या १५ दिवसीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी युवकांना अशुद्ध पाण्यासह निकृष्ट जेवण दिले जात असल्याचा प्रकार घडला आहे. त्यांना निवासाही व्यवस्थित व्यवस्था करण्यात आली नसल्याची तक्रार शिबिरार्थींनी ‘सकाळ’शी बोलताना केली.  

नेहरू युवा केंद्रातर्फे सटाणा येथे बागलाण ॲकॅडमी सैनिकी प्रशिक्षण संस्था व टाटा समाज विज्ञान संस्था, मुंबई यांच्यातर्फे ७ ते २१ जुलैदरम्यान राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रशिक्षण शिबिर होत आहे. शिबिरात नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, वाशीम या जिल्ह्यांतील १०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. काल रात्री या स्वयंसेवकांना अकादमीच्या खोल्यांमध्ये झोपविण्यात आले. या ठिकाणी पुरेशी स्वच्छतागृहे नव्हती. त्यामुळे बाहेर उघड्यावर बसण्याची वेळ आली. पाण्याला वास, तर निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात आले. सकाळी वेळेवर नाश्‍तादेखील देण्यात आला नव्हता. अधिकाऱ्यांना स्वयंसेवकांनी सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मान डोलवणे पसंत केले. काही मुलांना रात्री पोटाचा त्रास होऊ लागल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले. प्रशिक्षण आयोजित करण्याचा देखावा नेहरू युवा केंद्राच्या अधिकाऱ्यांनी थांबवावा, अशी माफक अपेक्षा स्वयंसेवकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

प्रशिक्षण शिबिराचे उद्‌घाटन 
सटाणा : येथील बागलाण अकादमी सैनिकी प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रशिक्षण शिबिराचे प्राचार्य उद्‌घाटन डॉ. एस. जी. बाविस्कर यांच्या हस्ते झाले. बागलाण अकादमीचे संचालक आनंदा महाले, प्रा. कविता निकम, नीतेश ह्याळीज, सुनीता महाले आदी प्रमुख पाहुणे होते. 

Web Title: nashik news youth