खिशात ठेवलेल्या ‘एमआय’ फोनच्या स्फोटाने युवक जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

नाशिक - ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवरून खरेदी केलेला एमआय कंपनीचा ‘रेडमी नोट ४’ हा फोन खिशात ठेवलेला असताना स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षात शिकणारा पंकज पवार हा युवक जखमी झाला. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून युवकावर दबाव आणत झालेला प्रकार दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पंकजने २४ सप्टेंबरला ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवरून एमआय कंपनीचा ‘रेडमी नोट ४’ हा मोबाईल खरेदी केला होता. त्याला हा मोबाईल २९ सप्टेंबरला घरपोच प्राप्त झाला. त्याने मोबाईलमध्ये सीमकार्डही टाकलेले नव्हते.

दरम्यान, पंकजने खिशात मोबाईल ठेवलेला असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला. यात पंकजच्या मांडीला जबर जखम झालेली आहे. या प्रकरणानंतर संपप्त झालेल्या पंकजने एमआय कंपनीच्या सर्व्हिस सेंटरवर तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. तेथील अधिकाऱ्यांनी दाद न देता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कंपनीच्या काही प्रतिनिधींनी पंकजचे घर गाठत वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. यात सुरवातीस वीस हजार रुपये भरपाई व नवीन फोन देण्यास कंपनी प्रतिनिधी तयार झाले. त्यानंतर तीस हजार व नंतर पन्नास हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्यास प्रतिनिधी तयार झाले होते. पण कंपनीने उत्पादनात झालेल्या चुकीची कबुली द्यावी, अशी मागणी पंकजने केली. त्यामुळे प्रकरण दडपण्याचा कंपनीचा प्रयत्न फोल ठरला आहे.

खिशात ठेवलेला असताना फोनचा अचानक स्फोट झाला. कंपनीने झालेली चूक मान्य करावी. झालेला प्रकार गंभीर असून, यातून सावध होण्याची गरज आहे.
- पंकज पवार, जखमी युवक

Web Title: nashik news youth injured by MI phone blast