गाडगे महाराज पुलावरून पुरात तरुणांच्या उड्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

नाशिक - गोदामाईला आलेला पूर पाहण्यासाठी आलेले तरुण गाडगे महाराज पुलावर कठड्यावर रेलून सेल्फी काढत होते. गोदाकाठावर राहणारे काही तरुण याच पुलावरून पुराच्या पाण्यात उड्या घेत स्वतःचा जीव धोक्‍यात घालत होते. पाण्याची पातळी वाढल्यानंतर सायंकाळी मार्गावरील वाहतूकही बंद करण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्‌स लावले. 

पूर पाहण्यासाठी आलेले काही तरुण गाडगे महाराज पुलाच्या लोखंडी कठड्यावर रेलून सेल्फी घेत होते. लोखंडी अँगल ओलसर असल्याने त्यावरून हात निसटून खाली पडण्याचीही शक्‍यता असताना तरुणाई धोका पत्करत होती. पंचवटीतील काही तरुण याच कठड्यावरून पुराच्या पाण्यात उड्या घेत होते, तर पुलावर गर्दी केलेल्यांना धाडस दाखविण्यासाठीच काही तरुण पुराच्या पाण्यात उड्या घेत होते. त्याचवेळी पुलावरून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे वाहन दक्षता घेण्यासंदर्भातील सूचना देत होते. सायंकाळी पुराच्या पाण्यात वाढ होत असतानाच, गाडगे महाराज पुलाखाली जाणाऱ्या रस्त्यापर्यंत पुराचे पाणी आल्याने त्याठिकाणी बॅरिकेड्‌स करून रस्ता अडविण्यात आला. तसेच पुलावर पूर पाहणाऱ्यांची गर्दी होऊ लागल्याने त्या ठिकाणी चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यासाठी बॅरिकेड्‌स करण्यात आले. मात्र, तरीही पुलावर गर्दी कायम होती.

सोमेश्‍वरकडे जाणारा मार्ग बंद
गंगापूर रोडवरील सोमेश्‍वर धबधबा पाहण्यासाठी आज सकाळपासूनच तरुणांनी गर्दी केली. दुपारनंतर पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागल्याने महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी सोमेश्‍वर मंदिराकडे जाणारा मार्ग बंद केला. तसेच तेथे असलेल्या पर्यटक-भाविकांनाही ते स्थान सोडण्याच्या सूचना केल्या, तरीही काही तरुण धोकादायक धबधब्याकडे जाण्याचा प्रयत्न करीत होते. काही काठालगत उभे राहून सेल्फी काढत होते.

Web Title: nashik news Youths flutter on the bridge from Gadge Maharaj bridge