जि.प.च्या स्वच्छ विभागांचा पुढील आठवड्यात होणार गौरव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

नाशिक - जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा परिषदेला अचानक भेट देऊन विभागांमधील स्वच्छता वेशीला टांगली होती. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने प्रत्येक विभागात स्वच्छता व लेखा वर्गीकरण मोहीम राबविली. बहुतांश विभागांत ही मोहिम दिवाळीपूर्वीच पूर्ण झाली आहे. तसेच अभिलेख कक्षांमध्येही वर्गीकरण पूर्ण झाल्याचे समजते. कृषी वगळता जिल्हा परिषदेतील सर्व विभाग नीटनेटके झाले आहेत. या स्वच्छ झालेल्या विभागांचा पुढील आठवड्यात गौरव करण्यात येणार आहे. 

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लोणीकर यांनी पदाधिकाऱ्यांच्या कक्षासह आरोग्य व बांधकाम विभागातील स्वच्छतेची पाहणी केली होती. बांधकाम विभागातील कपड्यांमध्ये बांधून ठेवलेल्या फायलींचे ढिगारे पाहून हे लग्नाचे बस्ते पुन्हा दिसले नाही पाहिजे, असा इशारा दिला होता. तसेच महिनाभरात सर्वच विभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून अभिलेख कक्षात फायलींचे वर्गीकरण करण्याबरोबरच इमारतीची स्वच्छता व रंगरंगोटी करण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिणा यांनी सर्वच विभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश काढले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सर्वच विभागांना भेटी देऊन स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे सर्वच खातेप्रमुखांनी स्वच्छता मोहीम राबविल्याने जिल्हा परिषदेत दिवाळीपूर्वीच्या स्वच्छतेचे वातावरण होते. सर्वच विभागांनी अनावश्‍यक कागदपत्रांची विल्हेवाट लावण्याबरोबरच कामकाजाच्या फायली अभिलेख कक्षात वर्गीकरण करून मांडल्या आहेत. चांगली स्वच्छता व नीटनेटक्‍या विभागांचा पुढील आठवड्यात गौरव केला जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिणा यांनी सांगितले.

Web Title: nashik news zp