जि. प. शिक्षकांच्या दिवाळीनंतर बदल्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

देऊर (जि. धुळे) - राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या दिवाळीनंतर होणार आहेत. बदल्यांबाबतच्या 12 सप्टेंबरच्या निर्णयास सरकारने स्थगिती दिल्यानंतर 27 फेब्रुवारी 2017 च्या निर्णयानुसार या बदल्या होणार आहेत. शिक्षण विभागाने तसे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्याने सहा महिने लांबलेल्या बदल्या अखेर होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

सरकारने 12 सप्टेंबरच्या निर्णयानुसार बदल्यांची प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली होती; मात्र, राज्यभरात शिक्षक संघटनांकडून आक्षेप नोंदविण्यात आले होते. तशा याचिका औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या निर्णयास न्यायालयाने स्थगिती दिल्याने सर्वंकष बाजूने विचार करता 27 फेब्रुवारीचा निर्णयच योग्य असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. त्यानुसारच या संगणकीय बदल्या होतील. ऑनलाइन बदली पोर्टलवर बदलीसाठी सुधारित अर्ज तत्काळ उपलब्ध करून दिले आहेत.

Web Title: nashik news zp teacher transfer