होर्डिंगधारकांकडून एक कोटीवर दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

नाशिक - शहरातील अनधिकृत होर्डिंगवरून अतिक्रमण निर्मूलन विभाग स्थायी समितीच्या रडारवर आला असतानाच खडबडून जाग्या झालेल्या विभागाने कारवाई करून तब्बल एक कोटी सहा लाख रुपयांचा महसूल दंडाच्या रूपाने जमा केला आहे. यावरून अतिक्रमण निर्मूलन विभागाने यापूर्वीच अनधिकृत होर्डिंगवर का कारवाई केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. कारवाईच्या भीतीने अतिक्रमण विभागाने आजपासून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू केली. पश्‍चिम विभागातील ७० होर्डिंग हटविण्यात आले. साखलाज मॉलजवळील होर्डिंग आज हटविण्यात आले.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम व अधीक्षक सुरेश आहेर यांच्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी ‘स्थायी’ने चौकशी समिती स्थापन केल्यानंतर यापूर्वी जाहीर केलेल्या १५८ होर्डिंगधारकांवर कारवाई सुरू झाली. सातपूर विभागातील १७ एजन्सीचे २० पैकी सहा होर्डिंग हटविण्यात आले. त्यांच्याकडून नऊ लाख ४८ हजार ४० रुपये रक्कम वसूल करण्यात आली. कारवाईनंतर १६ होर्डिंगधारकांकडून एक कोटी सहा लाख ६६ हजार ७३३ रुपये दंडात्मक कारवाईतून वसूल करण्यात आले. १५८ पैकी पश्‍चिम विभागात सर्वाधिक ७० अनधिकृत होर्डिंग आहेत. पूर्व विभागात नऊ, पंचवटी विभागात २८, नाशिक रोड विभागात १९, सिडकोत १२ अनधिकृत होर्डिंग आहेत. जाहिरात कर, परवाना शुल्क, जागामालकांचे हमीपत्र, स्थैर्यता प्रमाणपत्र, होर्डिंगचा साचा आराखडा व पोलिसांचा ना हरकत दाखला आदी कागदपत्रे सादर करण्यासह पाचपट दंड भरल्यास होर्डिंग नियमितीकरण करता येणार आहे.

Web Title: nashik one crore fine on hording owner