मुथूट फायनान्सच्या दरोड्यातील 'त्याला' बिहारमधून उचलणार 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 December 2019

एका उद्‌घाटन सोहळ्याप्रसंगी नांगरे-पाटील यांनी सांगितले, की छोट्याशा पुराव्यावरून गुन्हेगारापर्यंत पोचता येते. मुथूट फायनान्स दरोडा त्याचे एक उदाहरण आहे. छोट्याश्‍या पुराव्याने पाच आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. तर मुख्य संशयित सुबोध सिंग हा बिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

नाशिक : उंटवाडी भागातील मुथूट फायनान्स कार्यालयावर काही महिन्यांपूर्वी दरोडा पडला होता. त्यातील पाच आरोपी अटक असून, मुख्य आरोपी बिहार तुरुंगात आहे. त्याच्या प्रत्यारोपणाचे काम सुरू असून, लवकरच त्याचा ताबा घेण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा > शेजारच्या व्यक्तीसोबतच पत्नीचे अनैतिक संबंध कळताच...पतीने....

छोट्याशा पुराव्यावरून गुन्हेगारापर्यंत पोचता येते - नांगरे पाटील

नाशिक सराफ असोसिएशनतर्फे शहराच्या सराफ बाजारात सीसीटीव्ही कॅमेराचे सुरक्षाकवच लावले आहे. त्याच्या उद्‌घाटन सोहळ्याप्रसंगी नांगरे-पाटील यांनी सांगितले, की छोट्याशा पुराव्यावरून गुन्हेगारापर्यंत पोचता येते. मुथूट फायनान्स दरोडा त्याचे एक उदाहरण आहे. छोट्याश्‍या पुराव्याने पाच आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. तर मुख्य संशयित सुबोध सिंग हा बिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याने 2008 मध्ये एकमेकांचे नाव माहिती नाही. अशा संशयितांना घेऊन दरोड्याचा कट रचला होता. दरोड्याची रेकी करून अज्ञात संशयितांच्या मदतीने काही महिन्यांपूर्वी दरोडा टाकला. त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. शिवाय त्याचा ताबा घेण्याचे कार्यही सुरू आहे. लवकरच त्यास अटक करण्यात येणार आहे. त्याच्यावर विविध ठिकाणी अनेक दरोड्यांचे गुन्हे दाखल आहेत.

Image may contain: one or more people, people standing, shoes and indoor

photo : नाशिकमधील मुथूट फायनान्स दरोडा

हेही वाचा > मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही...शोध घेतल्यावर ग्रामस्थांना धक्का...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Police will pick up accused in a Muthoot Finance robbery from Bihar said Vishwas Nangre Patil Marathi News