नाशिक प्राधिकरण आयुक्तांच्या प्रतीक्षेत

विनोद बेदरकर
सोमवार, 9 जुलै 2018

नाशिक - नाशिक महानगर प्रदेशच्या शाश्‍वत नियोजन व विकासासाठी प्राधिकरणाची निर्मिती झाली खरी, मात्र दीड वर्षानंतरही येथे वेळ आयुक्तही नाही. राज्यातील इतर प्राधिकरण नवनवे प्रकल्प हाताळत असताना, नाशिक प्राधिकरणात मनुष्यबळाचा विचार होत नाही.

नाशिक - नाशिक महानगर प्रदेशच्या शाश्‍वत नियोजन व विकासासाठी प्राधिकरणाची निर्मिती झाली खरी, मात्र दीड वर्षानंतरही येथे वेळ आयुक्तही नाही. राज्यातील इतर प्राधिकरण नवनवे प्रकल्प हाताळत असताना, नाशिक प्राधिकरणात मनुष्यबळाचा विचार होत नाही.

राज्य शासनाने राज्यातील विविध प्राधिकरणांत नवनवे प्रयोग सुरू केले आहेत. नागपूर, पुणे या प्राधिकरणांत महानगर आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. नाशिकला मात्र चार कर्मचाऱ्यांवर प्राधिकरणाचा गाडा सुरू आहे. मुंबईत 1975 मध्ये स्थापन झालेल्या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई महानगरात रस्ते, पूल, मेट्रोची कामे केली. पण आता विकास आराखडे व प्रादेशिक आराखडे केले. नियोजनापुरते मर्यादित न राहता महानगर प्रदेशातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्राधिकरणाने ई-बस उपक्रम राबविला आहे. स्मार्ट बीकेसी (बांद्रा कुर्ला संकुल) योजनेअंतर्गत बांद्रा कुर्ला संकुलामध्ये ठिकठिकाणी कॅमेरे बसवले आहेत.

ऑनलाइन मार्केटचे "एट भिवंडी हब
मुंबई प्राधिकरणाने "एट भिवंडी हब' सुरू केले. त्याचा अर्थ "भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्र' मुंबई महानगर प्राधिकरणाने त्यांच्या विकास आराखड्यात "भिवंडी येथे Transport Hub and Logistic Park हा जमीन वापर अनुज्ञेय केला आहे. त्यामुळे तेथे फ्लिपकार्ट, अमेझोन बहुराष्ट्रीय कंपन्यांची गोदामे (warehouse) आहेत.

फ्लिपकार्ट, अमेझोनद्वारे ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकापर्यंत येण्यापूर्वी भिवंडीत हबमध्ये साठविल्या जातात. नाशिक प्राधिकरण आराखड्यातही कृषी, पर्यटनाशी निगडित रोजगार व प्रक्रिया केंद्रांचे नियोजन आहे. मात्र राज्यातील मुंबई, नागपूरसह विविध प्राधिकरणांत नियोजन साकारत असताना नाशिकला दीड वर्ष झाले, पण काहीही निर्णय झालेला नाही.

Web Title: nashik pradhikaran development commissioner