उत्तर महाराष्ट्रात नाशिकची विक्रमी महसूल वसुली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नाशिक - "जीएसटी'मुळे करमणूककरात झालेली घट, पर्यावरणहमीमुळे वाळू लिलावांना मिळत नसलेला प्रतिसाद यामुळे उत्तर महाराष्ट्रातील महसूल वसुलीला फटका बसला. नगर, जळगाव जिल्ह्यांत उद्दिष्टही पूर्ण होऊ शकले नाही. नाशिकला मात्र सुमारे 38 कोटींची अधिक महसूल वसुली झाली. 

नाशिकला उद्दिष्टाच्या 123 टक्के महसूल वसुली झाली. नगर व जळगावचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. नाशिक जिल्ह्यात मात्र जुन्या शर्तीच्या प्रकरणांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित करत अखेरच्या एका दिवसात 12 कोटींहून अधिक वसुली केली. प्रत्यक्ष महसूल वसुलीऐवजी काही व्यवहारांत पुस्तकनोंदीतून निधी वळता करताना मालेगावसह इतर काही विभागांकडील थकीत वसुली वळती करून उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न झाले. त्यामुळे महसुलाचे उद्दिष्ट साध्य झाले. 

महसूल वसुली (कोटी रुपयांत) 
जिल्हा उद्दिष्ट वसुली घट-वाढ 
नाशिक 175 213 38 कोटी वाढ 
जळगाव 132 116 16 कोटी घट 
नगर 134 109 25 कोटी घट 
धुळे 55 56 एक कोटी 
नंदुरबार 44 45 एक कोटी 

Web Title: Nashik record revenue collection