राज्यातील 195 रस्ते- पूल सुधारणांची कामे मान्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

नाशिक-  राज्यातील रस्ते आणि पूल सुधारणांची कामे "हायब्रीड ऍन्युटी' तत्त्वावर करण्याचा निर्णय घेण्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्थसंकल्पी पुस्तकात 195 कामे समाविष्ट केली आहेत. तसेच, 2016-17 साठी 200 कोटींची तरतूद केली आहे. येत्या दोन वर्षांमध्ये 90 हजार किलोमीटरपैकी 10 हजार किलोमीटरची सुधारणांची कामे पूर्ण केली जातील.

]
अर्थसंकल्पीय पुस्तकामध्ये नमूद असलेल्या कामांपैकी 53 कामे मोठी आहेत. आता या कामांचे सर्वेक्षण होऊन सविस्तर प्रकल्पाच्या जोडीलाच आराखडे तयार होतील. त्यानंतर कामांच्या निविदा मंजूर होतील. 30 हजार कोटींच्या कामांना सरकारकडून 12 हजार कोटी दिले जाणार आहेत. खासगी सहभागातून उद्योजकांनी 18 हजार कोटींची गुंतवणूक करावयाची आहे.

सरकारकडून 40 टक्के रक्कम उद्योजकाला पाच समान हप्त्यांत दिली जाणार आहे. उद्योजकांना व्याजाचा दर हा बॅंक दर आणि तीन टक्के असा निश्‍चित करण्यात आला आहे. आर्थिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला असला, तरीही सरकारला एवढी मोठी रक्कम वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करावी लागण्याची चिन्हे वरिष्ठ अभियंत्यांशी केलेल्या चर्चेतून दिसू लागली आहेत.

जिल्हानिहाय रस्त्यांवरील अंदाजित खर्च
(आकडे कोटी रुपयांमध्ये)
0 सोलापूर - 870 0 पुणे - 2491
0 सातारा - 856 0 सांगली - 1067
0 नांदेड - 1401 0 बीड - 723
0 बुलडाणा - 1884 0 लातूर - 468
0 नगर - 703 0 जालना - 593
0 सिंधुदुर्ग - 2887 0 नागपूर - 693
0 भंडारा - 390 0 गडचिरोली - 823
0 चंद्रपूर - 1215 0 वर्धा - 520
0 अकोला- बुलडाणा - 124 0 अकोला- बुलडाणा- वाशीम - 247
0 अकोला- वाशीम - 145 0 अकोला- अमरावती - 288
0 उस्मानाबाद- लातूर - 141 0 यवतमाळ- वाशीम - 283
0 हिंगोली - 571 0 अकोला - 105
0 उस्मानाबाद - 426 0 वाशीम - 720
0 अमरावती - 1214 0 परभणी - 775
0 औरंगाबाद - 719 0 यवतमाळ - 788
0 गोंदिया - 336 0 रत्नागिरी - 842
0 ठाणे - 661 0 रायगड - 945
0 पालघर - 1147 0 कोल्हापूर - 232

Web Title: nashik roads