PHOTO :...अन्‌ दिवस शांततेत मावळला 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

अयोध्या निकालामुळे वातावरण बिघडू नये, यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले होते. शांतता समितीच्या बैठकांसह कडक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्तामुळे सकाळी काही काळ वातावरण तंग दिसत होते. मात्र, शनिवारी सकाळपासून नागरिकांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू राहिले.नेहमीची गर्दी, सुरळीत कामकाजामुळे शनिवारी कुठलाही वेगळा किंवा अनुचित प्रकाराचा प्रभाव दिसला नाही. निकालाच्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, रोजच्या प्रमाणेच शनिवारचा दिवस उजाडला आणि तसाच मावळला.

नाशिक : अयोध्या येथील रामजन्मभूमीसंबंधीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कुठलाही अनुचित प्रकार न घडता नाशिक शहर-जिल्ह्यात दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू होते. पोलिस बंदोबस्ताचे नियोजन असले, तरी दैनंदिन कामकाजातून नाशिकच्या नागरिकांनी सौहार्दाचे दर्शन घडविले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी (ता. 9) दिला. हिंदू-मुस्लिम अशा दोन प्रमुख धर्मांशी संबंधित असलेल्या या निकालामुळे वातावरण बिघडू नये यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले होते. शांतता समितीच्या बैठकांसह कडक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्तामुळे सकाळी काही काळ वातावरण तंग दिसत होते. मात्र, शनिवारी सकाळपासून नागरिकांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू राहिले.

Image may contain: 26 people, including अमित दिपकराव घुगे, crowd

निकालानंतर नाशिकची धार्मिक सौहार्दतेची परंपरा कायम 

नेहमीची गर्दी, सुरळीत कामकाजामुळे शनिवारी कुठलाही वेगळा किंवा अनुचित प्रकाराचा प्रभाव दिसला नाही. निकालाच्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, रोजच्या प्रमाणेच शनिवारचा दिवस उजाडला आणि तसाच मावळला. शहर व ग्रामीण पोलिसांनी पोलिस ठाणेनिहाय शांतता समितीच्या बैठका घेतल्या होत्या. सर्वधर्मीय बांधवांना निकाल काहीही लागो मात्र, सामाजिक, धार्मिक सलोखा राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. त्यास सर्वधर्मीयांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

संवेदनशनील भागात गस्त

पोलिसांनी खबरदारी म्हणून शहरासह जिल्ह्यात बंदोबस्त तैनात केला होता. संवेदनशनील भागात गस्त सुरू होती. सायबर पेट्रोलिंगद्वारे सोशल मीडियावरही पोलिसांनी लक्ष ठेवले होते. शहरासह ग्रामीण पोलिसांनी हजारो पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी ठाण मांडले. नागरिकांशी संवाद ठेवण्यावर पोलिसांनी भर दिला. शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत 200 पोलिस अधिकारी, 4 हजार 500 कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दल, शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलिस दलाच्या आपत्कालीन पथकांचा बंदोबस्त तैनात होता.

Image may contain: one or more people, table and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik routine continues after the Ayodhya Result