नाशिकच्या 'स्टार्ट अप'ला अमेरिकेचे पारितोषिक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

नाशिक - नाशिकमधील एसजी स्टुडिओ 4 टेक्‍नॉलॉजिज प्रा. लि. या स्टार्ट अप कंपनीने अमेरिकी सरकारच्या हेल्थकेअर ऍप स्पर्धेत सहभागी होत मोठे यश मिळविले आहे. दोन टप्प्यांत झालेल्या या स्पर्धेत नाशिकच्या पथकाने अमेरिकेतील भागीदारासह सर्वात्कृष्ट ऍपचे 35 हजार डॉलरचे प्रथम पारितोषिक मिळविले. अमेरिकन सरकारच्या "सीएमएस'साठी गुणवत्ता आधारित देयक पद्धतीसाठी कंपनीने "ऍप' तयार केले आहे. भविष्यात अमेरिकेतील सुमारे बारा लाख क्‍लिनिक त्याचा वापर करतील, अशी माहिती कंपनीचे संस्थापक सोहम गरूड व देवयानी लाटे यांनी दिली.

"एसजी स्टुडिओ 4 टेक्‍नॉलॉजिज प्रा. लि.' ही नाशिकमधील स्टार्ट अप कंपनी असून, दोन तरुण उद्योजक त्यांचा कारभार सांभाळता आहेत. सोहम गरूड यांनी कॅलिफोर्नियात उच्च शिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षे सिलिकॉन व्हॅलीमध्ये अनुभव घेऊन नाशिकमध्ये ही कंपनी सुरू केली. देवयानी लाटे यांनी मिलान (इटली) येथे उच्च शिक्षण घेतले आहे. सोहम या कंपनीची तांत्रिक बाजू सांभाळत असून, देवयानी डिझाईन सांभाळते. ही कंपनी व्यावसायिक ऍप, डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंटसोबत स्वत:ची उत्पादन करत आहे.

अमेरिकेतील वैद्यकीय क्षेत्राचे व्यवस्थापन करणाऱ्या "सीएमएस'तर्फे अमेरिकेतील संगणक क्षेत्रासाठी दोन फेऱ्यांतील आव्हानात्मक स्पर्धा होती. पहिल्या फेरीत "ऍप' वापरण्याच्या क्‍लिनिससाठीचे रूपायन व नावीन्यपूर्ण संकल्पनांसाठी पाच कंपन्यांची निवड करण्यात आली. या सर्व संकल्पना वापरणाऱ्या प्रत्यक्ष "ऍप'चे तांत्रिक सादरीकरण दुसऱ्या फेरीत झाले. यात "एसजी स्टुडिओ 4 टेक्‍नॉलॉजिज'ला "कस्टमर व्हॅल्यू पार्टनर्स इंक' या अमेरिकी भागीदारासह प्रथम पारितोषिक मिळाले.

"स्मार्ट चॅट बॉट' व "गेमिफिकेशन' या आधुनिक तंत्रज्ञानाचा या "ऍप'मध्ये वापर केला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाला त्याच्या गुणवत्तेत वाढ करता येईल. राष्ट्रीय स्तरावर इतर व्यावसायिकांच्या स्पर्धेत स्वत:चे स्थान कळेल व त्यात सुधारणा करता येईल. त्या गुणवत्तेवर आधारित उत्पन्न मिळत असल्याने ग्राहकांनीही पैशांचे सेवेच्या स्वरूपात पूर्ण मूल्य मिळेल, असे गरूड म्हणाले.

वैद्यकीय क्षेत्रासाठी उपयुक्त
इलेक्‍ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड (ईएचआर) तंत्रावर आधारित हे "ऍप' भारतातील वैद्यकीय क्षेत्रासही आवश्‍यक आहे; तसेच उपचारात रुग्ण व रुग्णालय प्रशासनात होणाऱ्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर अशा प्रकारचे "ऍप' उपयुक्‍त ठरू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Web Title: Nashik Start app US award