शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांच्या शोध निबंधास पारितोषिक

रोशन खैरनार
शनिवार, 31 मार्च 2018

सटाणा (नाशिक) : मोरेनगर (ता. बागलाण) येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) संशोधन विभागातर्फे पुणे येथे आयोजित प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय शैक्षणिक शोध निबंध (नवोपक्रम) स्पर्धेत सादर केलेल्या 'चप्पल स्टॅन्ड माझा गणितगुरु' या विषयावरील नवोपक्रमास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) पुणेच्या संशोधन विभागातर्फे राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी दरवर्षी शैक्षणिक शोधनिबंध (नवोपक्रम) राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदा राज्यभरातून २४२ प्राथमिक शिक्षकांनी आपले विविध शोधनिबंध सादर केले होते. स्पर्धेत मोरेनगर (ता. बागलाण) शाळेच्या येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांनी सादर केलेल्या 'चप्पल स्टॅन्ड माझा गणितगुरु' या नवोपक्रमाला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.

प्रथम पाच क्रमांकाचे पारितोषिक मिळविणारे शिक्षक पुढीलप्रमाणे :

  • सोमनाथ वाळके (प्रथम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारगाव जि.बीड)
  • योगिता सदावरे (द्वितीय, विठामाता विद्यालय, कराड जि.सातारा)
  • रंजना स्वामी (तृतीय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धोत्री (जि.यवतमाळ)
  • सुनीता राणे (चतुर्थ, जिल्हा परिषद शाळा कोलेरवाडी जि. रत्नागिरी)
  • हर्षदा शेनॉय (पाचवा, महात्मा गांधी विद्यामंदिर, खानापूर जि.पुणे)

विद्या परिषद पुणे येथील महात्मा फुले सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रथम पाच तसेच उत्तेजनार्थ पाच क्रमांक मिळालेल्या स्पर्धक शिक्षकांना पुण्याच्या विद्या प्राधिकरणचे संचालक सुनील मगर, आय.सी.टी. संचालक विकास गरड, सुजाता लोहकरे, शोभा खंदारे, नेहा बेलसरे, उपसंचालक नामदेव शेंडकर यांच्या हस्ते पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात शिक्षिका वैशाली सुर्यवंशी यांना आपल्या नवोपक्रम सादरीकरणाची संधी मिळाली. त्यांच्या या यशाबद्दल बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतींद्र पाटील, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, बागलाणचे गटशिक्षणाधिकारी एस. एस. बच्छाव, विस्तार अधिकारी पी. आर. जाधव, कैलास पगार, मुख्याध्यापक एन. डी. सोनवणे, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सोपान खैरनार आदींसह तालुक्यातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: nashik teacher vaishali suryavanshi award