पिंपळगावला पारा चार अंशांवर

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

नाशिक : नाशिकसह जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असून, आज किमान तापमानात आणखी घसरण झाली.

राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद पिंपळगाव बसवंतला चार अंशांची नोंद झाली. निफाडला पाच, तर नाशिकला 5.4 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. सलग तीन दिवसांपासून राज्यातील किमान तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात होत आहे. आज दिवसभर बोचऱ्या वाऱ्याचा वेग अधिक राहिल्याने दिवसभर वातावरणात गारठा कायम होता. निफाड आणि नाशिकबरोबरच मालेगावमध्ये 7.4 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. मुंबई व कोकण किनारपट्टी वगळता उर्वरित राज्यात थंडीची लाट आहे.

Web Title: nashik temperature goes down