नाशिक जिल्हा परिषदेला गौरवाचा दुहेरी मुकुट

नवी दिल्ली - स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अभियानात सर्वाधिक प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल केंद्रीय पाणीपुरवठामंत्री उमा भारती यांच्याकडून मंगळवारी विशेष पुरस्कार स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते.
नवी दिल्ली - स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अभियानात सर्वाधिक प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल केंद्रीय पाणीपुरवठामंत्री उमा भारती यांच्याकडून मंगळवारी विशेष पुरस्कार स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते.

नाशिक - स्वच्छता सर्वेक्षण 2018 मध्ये देशात, तर पोषण आहार अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल देश अन्‌ राज्याच्या राजधानीमध्ये आज नाशिक जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला. दिल्लीत केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री उमा भारती यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी विशेष सन्मान स्वीकारला. मुंबईत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते महिला व बालविकास सभापती अपर्णा खोसकर, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रमोद पवार, महिला व बालविकास अधिकारी डी. बी. मुंडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, दीनदयाळ कौशल्य विकास कार्यक्रम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानापाठोपाठ जिल्ह्यास स्वच्छ सर्वेक्षण व पोषण आहार अभियान यात चांगले काम केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.

पोषण आहार अभियान 1 सप्टेंबर 2018 पासून सुरू झाले असून, त्या अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेने उपक्रम राबवले. यंत्रणेने केलेल्या या कामागिरीमुळे या अभियानात नाशिक जिल्हा पहिल्या स्थानावर राहिला. महात्मा गांधी जयंतीला अभियानाची सांगता झाली. त्यानिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात कार्यक्रम झाला. मंत्री मुंडे आणि महिला व बालविकासचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात नाशिक जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारला.

नाशिक जिल्ह्याला राज्यात आणि देशात पुरस्कार मिळाला ही जिल्हा वासीयांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. पदाधिकारी, सदस्य, प्रशासन आणि लोकसहभाग यांच्या सहभागातून हे यश जिल्ह्याला मिळाले. जिल्हा स्वच्छतेकडे निघालेला असताना पोषण आहारात केलेली कामगिरी सन्मानाला कारणीभूत ठरली आहे.
- शीतल सांगळे, अध्यक्षा, नाशिक जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com