Nashik Fraud Crime : कर्जाचे आमिष दाखवून 10 लाखांची फसवणूक | 10 Lakh fraud by showing loan Nashik Fraud Crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News Fraud

Nashik Fraud Crime : कर्जाचे आमिष दाखवून 10 लाखांची फसवणूक

Nashik Crime News : कंपनीसाठी पाच कोटी रुपयांचे कमी व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून संशयित चौघांची एकाची दहा लाख ५० हजारांची फसवणूक केली. मनोज वामन शिंदे (४५), सर्वेश मनोज शिंदे (३५, दोघे रा. ऋषिकेश हाईटस्‌, महात्मानगर), युवराज हरिशकुमार वर्मा, सुरताज मिर्झा (४७, दोघे रा. क्षितीजा अपार्टमेंट, अंधेरी वेस्ट, मुंबई) असे संशयितांची नावे आहेत. (10 Lakh fraud by showing loan Nashik Fraud Crime news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

'शुक्लेश्वर बजाबा वर्पे (रा. रुद्राक्ष पार्क, समर्थनगर, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना कंपनी सुरू करायची होती. त्यावेळी संशयितांनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना कंपनीसाठी दीर्घ मुदतीचे व कमी व्याजादराने ५ कोटी रुपयांचे कर्ज देतो असे आमिष दाखविले.

त्यासाठी संशयितांनी प्रोसेसिंग फिच्या नावाखाली त्यांच्याकडून १० लाख ५० हजार घेतले. परंतु त्यानंतरही कर्ज मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी इंदिरानगर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक राजपूत तपास करीत आहेत.