Nashik Crime News : भरदिवसा 10 तोळे सोन्याची लूट; संशयित बॅग घेऊन पसार

crime
crimeesakal

Nashik Crime News : सीबीएस हुतात्मा स्मारक परिसरातून दुचाकीवर आलेल्या संशयितांकडून सुमारे ४ लाख ८० हजार रुपये किमतीचे १० तोळे सोने असलेली बॅग ओरबाडून फरार झाले. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्याचा प्रयत्न केला. (10 tola gold looted in daylight suspect fled with bag Nashik Crime News)

पोलिस विभागाचे जुने नियंत्रण कक्ष गृह विभागाचे लिपिक मनोज महाजन एका खासगी बँकेत सोने तारण ठेवण्यासाठी सोमवारी (ता.१५) जात होते. तत्पूर्वी बँकेत बॉण्ड पेपर घेण्यासाठी जिल्हा न्यायालय समोरील हुतात्मा स्मारक परिसरात दुचाकी पार्क करण्यासाठी गेले.

दुचाकी पार्क करत असताना लाल रंगाच्या पल्सर दुचाकीवर न्यायालयाच्या दिशेने दोघे संशयित त्यांच्या दिशेने आले. त्यांच्या दुचाकीच्या पुढे जाऊन त्यांनी त्यांची दुचाकी वळवून आणली. मागे बसलेल्या संशयिताने श्री. महाजन यांच्या हातातील काळ्या रंगाची बॅग ओरबाडून सीबीएस सिग्नलच्या दिशेने पळ काढला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crime
Jalgaon Crime News : गोड बोलत सहा वर्षीय चिमुरडीवर अतिप्रसंग, आईने आरडाओरड करताच..

त्यांनी आरडाओरड केला, तोपर्यंत संशयित दिसेनासे झाले. त्यानंतर त्यांनी भद्रकाली पोलिस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. महाजन यांच्याकडून घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली.

त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी सायंकाळी अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दिवसाढवळ्या तेही सीबीएससारख्या गजबजलेल्या परिसरातून सोन्याचे दागिने असलेली बॅग संशयिताकडून ओरबाडल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

crime
Nashik Crime News : दातली परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com