Nashik Corona Update : एका दिवसात कोविडचे 12 रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Positive

Nashik Corona Update : एका दिवसात कोविडचे 12 रुग्ण

नाशिक : शहरात कोविडचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. सोमवारी (ता. २०) एकाच दिवसात बारा कोविड बाधित रुग्ण आढळले. शहरात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २४ वर पोचली आहे. कोरोना सोबतच एच-३, एन-२ रुग्णही आढळून आले आहेत. (12 patients of covid in one day Nashik Corona Update news)

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

त्यामुळे टेस्ट, ट्रॅक, ट्रिट या त्रिसूत्रीनुसार कार्यरत राहण्याच्या सूचना महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे पाठोपाठ आता नाशिकमध्ये कोविड रुग्ण वाढत आहे.

१४ मार्चपासून कोविड रुग्ण आढळून येत आहे. २० मार्चला कोविड रुग्णांचा उच्चांक नोंदविला गेला. एकाच दिवशी बारा रुग्णांची नोंद झाली. कोविडबरोबरचं एच-३, एन-२ या फ्लूचा धोका वाढला आहे.

शहरात एच- ३, एन-२ देखील चार रुग्ण आढळले होते. कोविड रुग्ण वाढत असल्याने चाचण्या वाढविल्या जात आहे. सध्या दररोज अडीचशे चाचण्या केल्या जात आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने टेस्ट, ट्रेक, ट्रिट या त्रिसूत्रीनुसार काम सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

टॅग्स :NashikCorona updates