esakal | जोरदार पावसानंतरही नाशिकहून 127 ट्रक भाजीपाला रवाना
sakal

बोलून बातमी शोधा

nashik vegetables

जोरदार पावसानंतरही नाशिकहून १२७ ट्रक भाजीपाला रवाना

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : मुंबईत रविवार (ता. १८)पासून जोरदार पावसामुळे अनेक भागांतील व्यवहार विस्कळित झाले आहेत. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही नाशिकहून मुंबईला ७८, तर गुजरातला ३५ ट्रक भाजीपाला रवाना झाला. रविवारच्या तुलनेत सोमवारी (ता. १९) बाजारभाव स्थिर राहिले. आठ हजार सहाशे क्विंटल फळभाज्या, तर दोन हजार ७३ पालेभाज्यांची, तर दोन हजार ४४० क्विंटल फळे पाठविण्यात आली. यात मोसंबी, डाळिंब, पपई व आंबे यांचा समावेश आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी मुंबईकडे १४ ट्रक अधिक भाजीपाला रवाना झाला. यात पालेभाज्यांसह फळभाज्यांचा समावेश आहे. (127-trucks-of-vegetables-left-heavy- rains-marathi-news-jpd93)

रवाना झालेल्या वाहनांची संख्या

मुंबई, उपनगरे - ७८

गुजरात - ३५

औरंगाबाद - तीन

जळगाव - चार

दिल्ली - दोन

लखनौ - दोन

मध्य प्रदेश - तीन

एकूण वाहने - १२७

हेही वाचा: नाशिकमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ऑगस्टमध्ये तयारी

हेही वाचा: नाशिक रोडला भाजपमध्ये फूट; सानप समर्थक आमदारांची दांडी

loading image