
Nashik News: धक्कादायक! अवघ्या 14 वर्षाच्या मुलीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
Nashik News : वणी येथील कड गल्लीत राहणारे एस. टी. महामंडळाचे कर्मचारी प्रकाश गावित यांची दहावीत गेलेली मुलगी नेहा (१४) हिचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (14 year old girl dies of heart attack Nashik News)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सोमवारी (ता.२२) दुपारी साडे बाराच्या दरम्यान नेहाला उलटीचा त्रास झाला. उलट्या झाल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले, छातीमध्ये जास्त वेदना होऊ लागल्याने नातेवाईकांनी तातडीने जवळील खासगी रुग्णालयात आणले.
तेथील डॉक्टरांनी तपासले असता प्रकृती चिंताजनक वाटल्याने दुस-या खासगी रुग्णालयात पाठविले. तेथील डॉक्टरांनी तपासले असता नेहा हिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तिचा तीव्र हृदय विकाराचा झटका आल्याचे सांगितले.
नेहा ही वणी येथील कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती. ती अभ्यासातही हुशार होती. नेहाच्या अकाली मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.