बागलाणमध्ये लसीकरणाचा वेग वाढला; १७१० नागरिकांचे झाले लसीकरण

लसीकरणासाठी तालुका प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून, कोणीही वंचित राहणार नाही, असा विश्‍वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव यांनी व्यक्त केला.
Corona Vaccination
Corona Vaccinatione-sakal

सटाणा (जि. नाशिक) : कोविड प्रतिबंधक (covid) लसीकरण (Vaccination) १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी शासनाने तूर्त स्थगित केल्याने बागलाण तालुक्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर(Vaccination center) दुसऱ्या लससाठी उसळणारी गर्दी आटोक्यात आली आहे. लसीकरणासाठी तालुका प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून, कोणीही वंचित राहणार नाही, असा विश्‍वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव यांनी व्यक्त केला. (1710 citizens get vaccinated in Baglan)

रजिस्ट्रेशन करणे सहज शक्य

गुरुवारी (ता. १३) सर्वच लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांसह नवीन लस घेणाऱ्यांना आपले रजिस्ट्रेशन(Registration) करणे सहज शक्य होत होते. त्यामुळे पंधरा दिवसांपासून लसीकरणाच्या मिस मॅनेजमेंटबाबत(Mismanagement) सर्व स्तरातून उठणाऱ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. गुरुवारी तालुक्यातील १३ केंद्रांवर १७१० नागरिकांना लसीकरण झाले.

Corona Vaccination
ठाकरे सरकारला मराठा आरक्षण मिळू द्यायचं नाहीये; विनायक मेटेंचा आरोप

केंद्रनिहाय लसीकरण पुढीलप्रमाणे...

- सटाणा ग्रामीण रुग्णालय ३६०

- ब्राह्मणगाव आरोग्य केंद्र - २८०

- आलियाबाद आरोग्य केंद्र -४२

- अंबासन आरोग्य केंद्र - १०२

- कपालेश्‍वर आरोग्य केंद्र -४५

- जायखेडा आरोग्य केंद्र - १५०

- जुने निरपूर आरोग्य केंद्र - १००

- वीरगाव आरोग्य केंद्र -११०

- ताहाराबाद आरोग्य केंद्र -१२०

- केळझर आरोग्य केंद्र -१८

- नामपूर आरोग्य केंद्र -३०

एकूण-१७१०

(1710 citizens get vaccinated in Baglan)

Corona Vaccination
नाशिकमध्ये 'रेमडेसिव्हिर'चा काळाबाजार; मेडिकल बॉयसह 3 नर्स ताब्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com