मालेगाव दंगलीतील १८ संशयितांचा जामीन नामंजूर

Malegaon Riot
Malegaon Riot esakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात त्रिपुरा (Tripura) घटनेच्या निषेधार्थ १२ नोव्हेंबर २०२१ ला पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान झालेला हिंसाचार, तोडफोड, दगडफेक व दंगल (Riot) प्रकरणातील माजी नगरसेवक रहेमान शाह, आवामी पक्षाचे (National Awami Party) अध्यक्ष रिजवान बॅटरीवाला, नफीस खान आदींसह १८ संशयितांचा जामीन अर्ज बुधवारी (ता. २३) येथील न्यायालयाने फेटाळून लावला. अपर जिल्हा सत्र न्यायाधीश (Additional District Sessions Judge) डी. डी. कुरुळकर यांनी हा निर्णय दिला.

Malegaon Riot
Jalna Riot : जालन्यात दंगल, एक जण गंभीर जखमी; परिस्थिती नियंत्रणात

दंगल प्रकरणातील आयेशानगर व शहर पोलिस ठाण्यात दाखल तीन गुन्ह्यांतील हे संशयित होते. दंगलप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत पाच गुन्हे दाखल झाले होते. मंगळवारी या संशयितांच्या जामिनावर (Bail) युक्तिवाद झाला होता. सरकार पक्षातर्फे संशयितांना जामीन दिल्यास शांततेचा भंग होईल. साक्षीदारांवर ते दबाव आणू शकतात. यांसह विविध मुद्दे मांडण्यात आले. उपअधीक्षक लता दोंदे, पोलिस निरीक्षक सुरेश घुसर यांनी न्यायालयात बाजू मांडली. दंगलीपूर्वी ८ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत संशयित रिजवानने प्रक्षोभक भाषण (Provocative Speech) केले होते.

Malegaon Riot
Dangals Of Crime: कुस्तीपट्टू सुशील कुमार अन् त्याचा गुन्हा आठवतोय का?

माजी नगरसेवक शाह यांनीही सोशल मीडियावर (Social Media) वादग्रस्त मजकूर टाकला होता. जामिनावर सुनावणीनंतर मंगळवारी (ता. २२) निर्णय राखून ठेवण्यात आला होता. आज सर्व संशयितांचा जामीन फेटाळण्यात आला. जिल्हा न्यायालयात (District Court) जामीन फेटाळल्याने संशयितांना आता उच्च न्यायालयात (High Court) जामीनासाठी धाव घ्यावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com