esakal | ..."नाहीतर माझ्याकडे आत्महत्या हाच पर्याय" का असं म्हणतोय हा युवक?
sakal

बोलून बातमी शोधा

shivaji patil qatar 1.jpg

राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे, खानदेश, विदर्भातील सुमारे 180 जण अडकून आहेत. यातील बहुतेकांनी नोकऱ्या गमावलेल्या आहेत. या साऱ्यांनी भारतीय दुतावासाकडेही संपर्क साधला असून, अद्यापपर्यंत त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळू शकलेला नाही.

..."नाहीतर माझ्याकडे आत्महत्या हाच पर्याय" का असं म्हणतोय हा युवक?

sakal_logo
By
नरेश हळणोर ः सकाळ वृत्तसेवा

नाशिक : "कोरोनामुळे कंपनी बंद पडली. गेल्या अडीच महिन्यांपासून पगार नाही. कतारमध्ये प्रचंड महागाई वाढलेली... दुपारचे जेवण केले तर रात्रीच्या जेवणाची इच्छा होत नाही. जवळचे पैसेही संपत आलेत. तिकडे (नाशिक) कुटुंबीयांची परवड होते आहे. आता तर आत्महत्येचेच विचार मनात घोळताहेत... कृपया आम्हाला येथून सोडवा. परत आपल्या राज्यात (महाराष्ट्र) घेऊन चला... प्लीज...', अशी आर्त विनवणी करतोय आखाती देशातील कतार येथे अडकून असलेला युवक शिवाजी पाटील. 

कतारमध्ये अडकलेल्या युवकाची व्यथा;

शिवाजी वसंतराव पाटील हे मूळचे चाळीसगाव (जि. जळगाव) येथील रहिवासी असून, नाशिकमधील सिडकोत रहिवास आहे. शिवाजी हे आखाती देशातील कतार येथे नोकरीनिमित्ताने गेले. मात्र कोरोनामुळे कतारमध्येही लॉकडाउनची स्थिती उद्‌भवली. त्यामुळे अडीच महिन्यांपूर्वीच कंपनी बंद झाली असून, पगार नाही. परिणामी, जवळ असलेल्या पैशांवरच ते गेल्या अडीच महिन्यांपासून कतारमध्ये राहात आहेत. मात्र आता त्यांच्याजवळचे पैसेही संपत आले आहेत. कतारमध्ये प्रचंड महागाई वाढल्याने, एकवेळ जेवण करावे लागत आहे. 

राज्यातील 180 जणांना मदतीची प्रतीक्षा 
राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे, खानदेश, विदर्भातील सुमारे 180 जण अडकून आहेत. यातील बहुतेकांनी नोकऱ्या गमावलेल्या आहेत. या साऱ्यांनी भारतीय दुतावासाकडेही संपर्क साधला असून, अद्यापपर्यंत त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळू शकलेला नाही. वंदे-भारत संकल्पनेंतर्गत दोन आठवड्यांपूर्वी एक विमान केंद्र सरकारकडून आले; परंतु यात त्यांना संधी मिळू शकलेली नाही. पुन्हा वंदे-भारत विमान कधी येईल, याची कोणतीही शाश्‍वती भारतीय दुतावासाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वच हवालदिल झालेले आहेत. 

हेही वाचा > अंधश्रध्देचा खेळ आणि राज्यस्तरीय रॅकेटचा पर्दाफाश..मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यासह १९ जण सामील

पित्याची आतुरतेने वाट पाहतोय चिमुकला 
शिवाजी पाटील यांची पत्नी व आठ वर्षांचा आराध्य नाशिकमधील सिडकोत राहतात. लॉकडाउनमुळे ते सासरी चाळीसगाव येथे जाऊ शकलेले नाहीत. वडिलांना सुखरूप महाराष्ट्रात आपल्या घरी आणण्यासाठी त्यांचा मुलगा आराध्य याने महाराष्ट्र शासनाकडे विनवणी करीत, "माझ्या वडिलांना प्लीज घरी घेऊन या', असा फलक हातात घेत मागणी करीत आहे. 

हेही वाचा > भुजबळ संतापले...अधिकाऱ्यांना घेतले फैलावर...नेमके काय घडले?

कृपया, आम्हाला न्यायला या..
कंपनी बंद झाल्याने नोकरी गेली आहे. माझ्या पासपोर्टची मुदतही संपली आहे. खाण्या-पिण्याचे प्रचंड हाल होत आहेत. कृपया, आम्हाला न्यायला या.. आम्हाला आपल्या राज्यात, शहरात घेऊन चला... प्लीज...' -शिवाजी पाटील 

loading image