Nashik News : शहरात 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांच्या गळफास घेत आत्महत्त्या

death
death esakal

Nashik News : शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेत आत्महत्त्या केली आहे. यातील एक नामांकित शाळेच्या स्कुल बसचा वाहक म्हणून नोकरी करीत होता. (2 different incidents in city two committed suicide by hanging Nashik News)

गंगापूर रोडवरील मविप्रच्या अभिनव बालविकास मंदिर शाळेतील स्टाफ कॉटर्समध्ये एकाने गळफास घेत आत्महत्त्या केली. नितीन यशवंत लोहकरे (३१, रा. म्हाळसाकोरे, नांदूर मध्यमेश्वर, ता. निफाड) असे मयत युवकाचे नाव आहे.

नितीन हा अभिनव शाळेतील स्कुलबसवर वाहक म्हणून नोकरीला होता. गेल्याच महिन्यापासून त्याच्या वेतनातही वाढ झालेली होती. त्याच्या घरचीही परिस्थिती चांगली असून, तो एकुलता एक मुलगा होता. असे असताना त्याने सोमवारी (ता. १७) सकाळी स्टाफ कॉटर्समध्ये कापडी पट्ट्याने पंख्याला गळफास लावून घेतला.

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, हवालदार संजय चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत. तो मनमिळावू व सुस्वभावी असल्याचे शाळेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. मयत नितीनचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्याच्या आत्महत्त्येचे नेमके कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

death
Dhule Crime News : एरंडोलचा ट्रॅक्टर, ट्रॉली चोर गजाआड; तपासात दुसऱ्या‍ गुन्ह्याचीही कबुली

तसेच, दुसरी घटना जेलरोडला शिवाजीनगर येथे घडली. आदित्य पांडुरंग मोजाड (२२, रा. डिम घरकुल सोसायटी, शिवाजीनगर, जेलरोड) याने सोमवारी (ता. १७) सकाळी राहत्या घरात बेडरुममध्ये फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला.

वडील पांडुरंग व भावाने बेडरुमचा दरवाजा तोडून त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

death
Dhule Crime News : दोंडाईचात आयपीएल सट्ट्याचा डाव उधळला; माजी नगरसेवक ताब्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com