प्रत्येक विभागात 2 मॉडेल रोड; 12 प्रमुख रस्त्यांसाठी 240 कोटी

Road construction
Road constructionesakal

नाशिक : महापालिकेने (NMC) प्रत्येक विभागात दोन याप्रमाणे शहरात १२ प्रमुख रस्त्यांचे ‘मॉडेल रोड’ मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. २४० कोटी रुपये खर्चून हे मॉडेल रोड केले जाणार आहे. मॉडेल रोड करताना प्रत्येक विभागातील प्रमुख दोन मोठे रस्ते विचारात घेतले जाणार आहे. त्या रस्त्यावर थोड्या अंतराने भूमिगत पाइप टाकण्यात येणार आहे. तसेच पदपथ असतील. भूमिगत केबल किंवा तारा टाकण्यासाठी रस्ते खोदण्याची गरज राहणार नाही. (2 model roads in each section 240 crore for 12 major roads in city Nashik news)

महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी त्यासाठी प्रत्येक विभागातील दोन मोठे रस्ते मोठे व मॉडेल रोड या नावाने ओळखले जाण्यासाठी आवश्यक त्या कामासाठी सूचना दिल्या आहे. श्री. पवार हे स्वतः या रस्त्याची पाहणी करून लवकरात लवकर निविदा काढण्यासाठी प्रयत्नशील असून पावसाळ्यानंतर सुरु करण्याचा मनपा प्रशासनाचा विचार आहे. नाशिक पूर्व, सातपूर, नाशिक रोड, पश्चिम, सिडको, पंचवटी या सहा विभागांत प्रत्येकी दोन २४ मीटर ते ३० मीटर रुंदीचे रस्ते यासाठी निवडण्यात येणार आहे. प्रत्येक मॉडेल रस्त्याची लांबी किमान ५ किलोमीटर असेल. प्रत्येक मॉडेल रस्त्यासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च येणार आहे. अर्थसंकल्पात प्रशासकीय मान्यता आणि आर्थिक तरतूद असलेल्या अनेक विकासकामांना महापालिकेने कपात केली आहे. शिवाय गेल्या काही महिन्यांत मालमत्ता आणि पाणी कराच्या माध्यमातून महापालिकेच्या महसुलातही वाढ झाली आहे. महापालिकेला शहरासाठी आवश्यक असलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करून अनावश्यक कामांना आळा घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Road construction
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून घंटागाडी कर्मचाऱ्याने घेतला गळफास

"शहरात काही मोठे रस्ते आहेत. या रस्त्यातील दुभाजकाचे सौंदर्यीकरण करून काहीसा स्मार्ट रस्त्याचा लुक देऊन त्यात भूमिगत पाइप, चांगले पदपथ, आकर्षक पथदीप केल्यास अशा रस्त्यांचा नागिरकांना चांगला उपयोग होईल." - रमेश पवार, आयुक्त, महापालिका

Road construction
Nashik : प्रॉपर्टी वादातून माथेफिरु मुलाने आई वडीलांना पाठविले यमसदनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com