NDCC Bank : वैयक्तीक सभासदांसाठी 2 हजार अर्ज; जिल्हा बॅंकेच्या नोंदणीला चांगला प्रतिसाद | 2 thousand applications for individual members Good response to NDCC Bank registration nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NDCC Bank

NDCC Bank : वैयक्तीक सभासदांसाठी 2 हजार अर्ज; जिल्हा बॅंकेच्या नोंदणीला चांगला प्रतिसाद

NDCC Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भागभांडवलात वाढ करण्याच्या निर्णयानुसार बँकेने वैयक्तिक सभासद नोंदणी सुरु करण्यास सुरवात केली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पाच दिवसात तब्बल दीड हजार सभासदांनी अर्ज सादर केलेले आहेत. सोमवारी (ता.१५) सुमारे पाचशे सभासदांचे अर्ज प्राप्त झाले आहे. या अर्जदारांना लवकरच आगामी मासिक सभेत वैयक्तिक सभासद करून घेण्यात येणार आहे. (2 thousand applications for individual members Good response to NDCC Bank registration nashik news)

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६८ वर्षाची परंपरा असून ही बँक महाराष्ट्रातील नावाजलेल्या बँकामध्ये गणली जात होती. जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणात जिह्यातील सहकारी संस्थाची मातृसंस्था म्हणून बँकेने कामकाज केलेले आहे.

यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सभासद- शेतकऱ्याना आर्थिक मदत करून त्यांच्या शेती व शेतीपूरक कामासाठी या बँकेने अर्थसाहाय्य देऊन मोठे योगदान दिलेले आहे. बँकेच्या भागभांडवलात वाढ करण्याचा निर्णय बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता.

त्यानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या बॅंकेला वाचविण्यासाठी वसुलीवर भर देऊन वाढलेला एनपीए कमी करणे, नवीन वैयक्तिक सभासद वाढविणे यावर भर देण्यात आला. तसा निर्धार जिल्हा बॅंक बचाव मेळाव्यात करण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हे असतील अधिकार

बँकेने वैयक्तिक सभासद नोंदणी ८ मे पासून सुरु केली आहे. बँकेच्या वैयक्तिक सभासदांना महाराष्ट्र सहकार कायद्यानुसार बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

बँकेच्या निवडणुकीत उभे राहणे, मतदानाचा अधिकार तसेच इतर सभासदांना जे अधिकार लागू आहेत, ते वैयक्तिक सभासदांनाही लागू राहतील.

संधीचा लाभ घ्यावा ः प्रशासन

जिल्हा बॅंकेने वैयक्तिक सभासद होण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे, भविष्यात ती लवकर येणार नाही, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी

या संधीचा लाभ घ्यावा व जिल्ह्यातील लोकांनी बँकेचे वैयक्तिक सभासद होण्यासाठी आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन बँक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikNDCC