Nashik Crime: सोनसाखळी चोरट्यांचे सत्र थांबेना; भरदिवसा 2 महिलांचे सौभाग्याचे लेणे खेचले | 2 womens gold chain snatched during day Nashik Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chain Snatching Crime

Nashik Crime: सोनसाखळी चोरट्यांचे सत्र थांबेना; भरदिवसा 2 महिलांचे सौभाग्याचे लेणे खेचले

Nashik Crime : काही दिवसांपासून शहरात सातत्याने जबरी चोरीच्या घटना घडत आहेत. पोलिसांच्या उदासीनतेमुळे गुन्ह्याची उकल होत नसल्याने सोनसाखळी चोरट्यांनीही डोके वर काढले आहे.

शनिवारी (ता. ३) भरदिवसा सोनसाखळी चोरट्यांनी दोन विवाहितेच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून पोबारा केल्याने शहरालगतच्या ग्रामीण भागात महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. (2 womens gold chain snatched during day Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिसांनी वेळीच सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे. शेवगे दारणा रोडने विवाहिता पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ५६ हजार रुपयांची सोन्याची पोत खेचून नेली.

जान्हवी प्रथमेश सोनवणे (१९, रा. न्हावी वाडा, संसरीगाव) यांच्या फिर्यादीनुसार, सदर घटना शनिवारी (ता. ३) दुपारी घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक पाडवी तपास करीत आहेत.

तर, पळसे येथे सर्व्हिस रोडने भाजी मार्केटकडे जाणाऱ्या विवाहितेची सोन्याची २६ हजारांची पोत दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी खेचून नेली. अर्चना जगन्नाथ भालेराव (रा. फुलेनगर, पळसे) यांच्या फिर्यादीनुसार, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जात असताना सदर घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.