Sakal Exclusive : गावठाण, झोपडपट्टीत 20 हायड्रंट पॉइंट

Fire Hydrant Point latest Marathi News
Fire Hydrant Point latest Marathi Newsesakal

नाशिक : गावठाण व झोपडपट्टी भागात आग लागण्याची घटना घडल्यास अरुंद रस्त्यांमुळे घटनास्थळी पोचण्यास विलंब होतो. त्यामुळे वित्तहानी व जीवितहानी मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वीस ठिकाणी हायड्रंट पॉइंट प्रस्तावित करण्यात आले आहे. स्मार्टसिटी कंपनीमार्फत सुरू असलेल्या गावठाण विकास प्रकल्पाच्या माध्यमातून हायड्रंट पॉइंट विकसित केले जाणार आहे. (20 hydrant points in villages slums Planning to extinguish fire nashik Latest Marathi News)

विस्ताराच्या अंगाने नवीन नाशिक मोकळे शहर आहे. परंतु, गावठाण व झोपडपट्टी भाग अत्यंत दाटीवाटी व रहदारीचा आहे. त्यामुळे अशा भागात दिवसेंदिवस समस्या निर्माण होत आहे. गेल्या काही वर्षात आग लागण्याच्या घटना घडत आहे.

दीड वर्षात तीन मोठ्या घटना जुने नाशिकमध्ये घडल्या. कोरोनाकाळात गंजमाळ भागातील एका झोपडपट्टीला शॉटसर्किटमुळे आग लागून वित्तहानी झाली. गंजमाळ येथीलच मास्टर मॉलला लागलेल्या आगीत वित्तहानी झाली.

तर, तिसरी घटना मागील आठवड्यात घडली. मास्टर मॉलला लागलेल्या आगीत मानवी चुका अधिक प्रमाणात आढळल्या. उर्वरित दोन घटनांमध्ये अरुंद रस्त्यांचे कारण स्पष्ट झाले. आग लागल्यानंतर घटनास्थळी बंब पोचण्यासाठी रस्ते रुंद असावे लागतात.

मागील आठवड्यातील घटनेत बंब वेळेवर येऊनही जागेवर पोचता न आल्याने अधिक हानी झाली. प्राप्त परिस्थितीमध्ये घरे, झोपड्या तोडणे अशक्य आहे. मात्र, जीवित व वित्तहानी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे अग्निशमन विभागाने गावठाण व झोपडपट्टी भागात हायड्रंट पॉइंट टाकण्याचा प्रस्ताव स्मार्टसिटी कंपनीकडे सादर केला आहे.

Fire Hydrant Point latest Marathi News
NMCच्या अधिकाऱ्यांना स्वदेशी यंत्रावर भरवसा नाय; Make in India भूमिकेला हरताळ

स्वतंत्र पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव

स्मार्टसिटीअंतर्गत गावठाण विकासाचे काम सुरू आहे. यात प्रामुख्याने रस्त्यांच्या कामांचा सर्वाधिक भाग आहे. रस्ते तयार करताना वीज, टेलिफोन, इंटरनेट फायबर वायर, पाणी, ड्रेनेज या सुविधा केल्या जातात.

जेणेकरून रस्ता फोडण्याची आवश्यकता राहणार नाही. याच रस्त्यांमध्ये अग्निशमन साठी स्वतंत्र पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव दिला आहे. जेणेकरून आग लागण्याची घटना घडल्यास हायड्रंट पॉइंट मधून पाइपच्या माध्यमातून घटनास्थळी पाणी पोचविणे शक्य होणार आहे.

चाव्या अग्निशमन विभागाकडे

प्रस्तावित हायड्रंट पॉइंटच्या चाव्या अग्निशमन विभागाकडे असतील. त्याचबरोबर पाण्याचा दुरुपयोग होणार नाही. हायड्रंट पॉइंटचा वापर पाणी भरण्यासाठीदेखील होण्याची शक्यता असल्याने अग्निशमन विभाग स्वतःकडे चाव्या ठेवणार आहे.

यापूर्वी कालिदास नाट्यगृह व मेनरोड येथे दोन हायड्रंट पॉइंट होते. त्या पॉइंटवरून पिण्याचे पाणी उपसण्यासाठी उपयोग झाला. तसा दुरुपयोग होऊ नये, असे प्रयत्न नवीन हायड्रंट पॉइंट संदर्भात राहतील.

"हायड्रंट पॉइंटचा प्रस्ताव उपयोगी आहे. आयुक्तांकडून सूचना आल्यास तत्काळ अमलात आणता येणे शक्य आहे." -सुमंत मोरे, सीईओ, स्मार्टसिटी कंपनी.

"दाटीवाटीच्या भागात अग्निशमन बंब पोचत नाही. तेथे हायड्रंट पॉइंटच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. स्मार्टसिटी कंपनीकडे २० आयडेंट पॉइंटचा प्रस्ताव सादर केला आहे." - संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका.

Fire Hydrant Point latest Marathi News
विद्यार्थ्यांकडून प्राचीन वटवृक्षाला 25 फुटाची राखी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com