नाशिक ग्रामीणमध्ये पुन्‍हा कोरोनाचा फैलाव; आज २०४ पॉझिटिव्‍ह

corona
coronaesakal
Summary

जिल्‍ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्‍या आत आली होती. मात्र, निर्बंध शिथिल झाल्‍यानंतर बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी, नागरिकांचा निष्काळजीपणा पुन्‍हा कोरोना प्रादुर्भावाचे कारण ठरू शकतो.

नाशिक : कोरोनाचा फैलाव (Corona virus) ग्रामीण भागात पुन्‍हा वाढत आहे. दोन दिवसांपासून ग्रामीण भागात शंभराहून अधिक कोरोनाबाधित आढळत होते. त्‍यातच गुरुवारी (ता. २४) जिल्‍ह्यात आढळलेल्‍या २६३ कोरोना बाधितांपैकी २०४ नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. ही बाब चिंता वाढविणारी ठरू शकते. दरम्‍यान, जिल्‍ह्यात चार बाधितांचा मृत्‍यू झाला. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात एक हजार ४९४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. (204-corona-positive-patients-reported-in-rural-nashik-marathi-news)

निष्काळजीपणा कोरोना फैलावाचे कारण ठरू शकतो

जिल्‍ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्‍या आत आली होती. मात्र, निर्बंध शिथिल झाल्‍यानंतर बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी, नागरिकांचा निष्काळजीपणा पुन्‍हा कोरोना प्रादुर्भावाचे कारण ठरू शकतो. गुरुवारी नाशिक ग्रामीण क्षेत्रात २०४ पॉझिटिव्‍ह आढळले. नाशिक शहरातील ५६, जिल्‍हाबाहेरील तीन रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. दुसरीकडे २४९ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. जिल्‍ह्यातील चार मृतांमध्ये दोन नाशिक ग्रामीणमधील, तर दोन नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत.

corona
मालेगाव तालुक्यात पेरण्या खोळंबल्या, शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत

सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार १२३ अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणचे ४६७, नाशिक शहरातील ३४२, मालेगावच्‍या ३१४ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५९६ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ५४१ रुग्‍णांचा समावेश होता. जिल्‍हा रुग्‍णालयात तीन, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १२ रुग्‍ण दाखल झाले.

मालेगावमध्ये परिस्‍थिती नियंत्रणात

मालेगाव महापालिका क्षेत्रात गुरुवारी एकही पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळला नाही. येथील मृतांच्‍या संख्येतही फारशी वाढ झाली नाही. सध्या उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ८९ पर्यंत खालावली आहे.

मृतांच्‍या नोंदी सुरूच

गुरुवारी पोर्टलवर ५८ मृतांच्‍या नोंदी झाल्‍या. यात नाशिक ग्रामीणमधील ३७, नाशिक शहरातील २१ मृतांचा समावेश आहे.

(204-corona-positive-in-rural-nashik-marathi-news)

corona
शिवसेना फुंकणार महापालिका निवडणुकीचे रणशिंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com