
Water Black Spot: पावसाळ्याचे पाणी साचणारे 211 ब्लॅक स्पॉट! महापालिकेकडून उपाययोजना
Water Black Spot : पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक ठप्प होण्याबरोबरच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेने पावसाळ्यापूर्वीचे पाण्याचे ब्लॅक स्पॉट शोधून निचरा करण्याचे नियोजन केले आहे.
पावसाळ्याचे पाणी साचणारे एकूण २११ ब्लॅक स्पॉट शोधून काढले आहेत. (211 black spots that collect rain water Measures by Municipal Corporation nashik news)
दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात. त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने या वर्षांपासून पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना केली आहे. शहरात एकूण २११ पावसाळ्याचे पाणी साचणारे ब्लॅक स्पॉट शोधून काढण्यात आले आहे.
त्यात दहीपूल, मेनरोड, रविवार कारंजा, शालीमार, सारडा सर्कल, अशोक स्तंभ, गंगापूर रोड, कॉलेज रोड या ठिकाणी सर्वाधिक पाणी साचत असल्याचे सर्वेक्षण अंतिम निदर्शनास आले आहे. नाशिक रोड, पंचवटी, सिडको या उपनगरातील रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचते.
महापालिकेने शहरात जवळपास २११ पाणी साचण्याची ठिकाणे शोधून काढली आहे. त्यातील सिडको विभागात सर्वाधिक ठिकाणी ब्लॅक स्पॉट असून त्याची संख्या ६७ आहे. सर्वात कमी पाणी साचणारी ठिकाणे पंचवटी व पश्चिम विभागात आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ज्या ठिकाणी पावसाळ्याचे पाणी साचते अशा २११ पैकी १३८ ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहे.
पावसाचे पाणी साचणारे भाग
पूर्व : २६
पश्चिम : २४
पंचवटी : २४
नाशिक रोड : ३९
सिडको : ६७
सातपूर : ३१