Nashik News : मूत्रपिंड दान करून आत्याने दिले 22 वर्षीय भाच्याला जीवनदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team of Sahyadri Super Specialty Hospital successfully performed kidney transplant surgery.

Nashik News : मूत्रपिंड दान करून आत्याने दिले 22 वर्षीय भाच्याला जीवनदान

नाशिक : डायलिससवर असलेल्या भाच्याला मूत्रपिंड दान करून आत्याने जीवनदान दिले. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक येथे नुकतीच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.

यातील विशेष बाब म्हणजे २२ वर्षीय रुग्णावर आत्याचे मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले आहे. भाच्याला मूत्रपिंड दान देणाऱ्‍या त्याच्या आत्याची तब्येत तंदुरुस्त असल्याने मूत्रपिंड विकार आणि प्रत्यारोपण तज्ञ डॉ. प्रकाश उगले यांनी सांगितले. (22 year old nephew given life by his own aunt donating kidney Nashik News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

सह्याद्री हॉस्पिटलचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय चावला म्हणाले, की मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे अनुभवी शल्यचिकित्सक, सह्याद्री हॉस्पिटल नाशिकमध्ये उपलब्ध असलेले अद्ययावत तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची घेण्यात येणारी काळजी यामुळे हे प्रत्यारोपण यशस्वी झाले आहे.

सदर शस्त्रक्रिया मूत्रपिंड विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ. प्रकाश उगले यांच्या देखरेख व मार्गदर्शनाखाली युरोसर्जन डॉ. नंदन विळेकर, वैद्यकीय टिम व मॅनेजमेंट टीमच्या सहकार्याने यशस्वी पार पडली.