पाणीपुरवठा व्यवस्था सुधरविण्यासाठी २२५ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर

शासनाकडून प्रस्ताव मंजुरीची अपेक्षा
पाणीपुरवठा
पाणीपुरवठा sakal

नाशिक : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा व्यवस्था सुधरविण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तीनशे किलोमीटर वाहिन्यांचे जाळे पसरविण्यासाठी २२५ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. शासनाला सादर केलेल्या आराखड्यामुळे रॉ पाइपलाइन बदलण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत मुकणे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर नवीन नगरामध्ये जलवाहिन्या टाकण्यास प्राधान्य दिले जात आहे. शहरात दररोज चार दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा केला जातो. आठ जलशुद्धीकरण केंद्रांच्या माध्यमातून ११५ जलकुंभांद्वारे शहरात घरोघरी पाणी पोचविले जाते; परंतु शहराची लोकसंख्या वाढत असताना जलवाहिन्यांचे नवीन जाळे पसरविण्यासाठी आर्थिक क्षमता नसल्याने नव्याने राज्य शासनाकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

पाणीपुरवठा
CSK Player Retention : चेन्नईने धोनीपेक्षा जाडेजासाठी मोजली मोठी किंमत

नवीन नगरामध्ये पाइपलाइन टाकण्याबरोबरच गंगापूर धरणातून जलशुद्धीकरण केंद्रांना जोडण्यात आलेली रॉ पाइपलाइन बदलली जाणार आहे. शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते सातपूर सिमेंट पाइपलाइन जुनी झाल्याने वहनक्षमतादेखील कमी झाली आहे. त्यामुळे लोखंडी पाइपलाइन टाकली जाणार आहे.

शासनाकडून प्रस्ताव मंजुरीची अपेक्षा

सध्या शहरात दोन हजार २०० किलोमीटर लांबीचे पाइपलाइनचे जाळे आहे. या माध्यमातून दोन लाख ३०० नळजोडण्या आहेत; परंतु सद्यःस्थितीत पुरेसे पाणी पोचत नसल्याने तीनशे किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे नियोजन आहे. जलवाहिन्या वाढल्यानंतर जलकुंभदेखील वाढणार असून, सध्या अस्तित्वात असलेल्या ११५ जलकुंभांमध्ये साधारण २५ ते ३० जलकुंभांची भर पडेल. अर्थात राज्य शासनाने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर या बाबी शक्य होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com