
RTE Admission : येवल्यात 246 विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत मिळणार प्रवेश
येवला (जि. नाशिक) : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) देण्यात येणाऱ्या २५ टक्के आरक्षणांतर्गत मोफत प्रवेश प्रकियेला सुरवात झाली असून, आगामी शैक्षणिक वर्षासाठी इच्छुकांना १७ मार्चपर्यत ऑनलाइन अर्ज भरता येतील. पहिलीसाठी तालुक्यात २३ शाळांमध्ये सुमारे २४६ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची संधी मिळणार आहे. (246 students will get admission under RTE at yeola nashik news)
तालुक्यात आरटीई अंतर्गत खासगी विना अनुदानित- स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
त्यानुसार तालुक्यातील सुमारे २३ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी असून, पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यास १ मार्च दुपारी तीनपासून सुरुवात झाली असून १७ मार्चपर्यत मुदत असल्याचे प्र. गटशिक्षणाधिकारी प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.
तालुक्यातील स्वामी मुक्तानंद इंग्लिश स्कूल येवला, मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश स्कूल अंदरसूल, जय बाबाजी इंग्लिश स्कूल नगरसूल, जीवन अमृत इंग्लिश स्कूल, मुखेड, आर्या निकेतन इंग्लिश स्कूल, पारेगाव, अभिनव बालविकास मंदिर, येवला, ओम गुरुदेव इंग्लिश स्कूल, येवला,
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
आत्मा मालिक इंग्लिश स्कूल, पुरणगाव, कांचनसुधा ॲकॅडमी, येवला, अभिनव बालविकास मंदिर, पाटोदा, एसएनडी इंग्लिश सीबीएसई स्कूल, बाभूळगाव, एसएनडी इंग्लिश स्कूल, बाभूळगाव, गणाधीश इंटरनॅशनल स्कूल,
राजापूर, श्री साईनाथ इंग्लिश स्कूल, धुळगाव, बनकर-पाटील इंग्लिश सीबीएसई स्कूल अंगणगाव, लक्ष्मी इंग्लिश स्कूल, विखरणी, राधिका इंग्लिश स्कूल, अंदरसूल, राजेश कदम इंग्लिश स्कूल, जळगाव नेऊर,
संतोष इंग्लिश स्कूल, रहाडी, मातोश्री इंटरनॅशनल स्कूल, धानोरे, सईग्रीन इंग्लिश स्कूल, नगरसूल, कांचनसुधा इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, धानोरे, संतोष इंग्लिश स्कूल जळगाव नेऊर या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे.
प्रवेशासाठी पाल्याचा जन्म तारखेचा पुरावा, जातीचा तसेच उत्पन्नाचा तहसीलदार यांचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला, पालकाचा रहिवासी पुरावा, अपंगत्वाचा पुरावा हे कागदपत्रे आवश्यक आहेत. कागदपत्रासह पालकांनी www.rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरून योजनेचा लाभ घ्यावा.