Nashik News : धनादेश न वटल्याप्रकरणी 25 लाखांचा दंड

25 lakh fine for non cashing of cheques for lease Damper  Executor Machine
25 lakh fine for non cashing of cheques for lease Damper Executor Machineesakal

नाशिक : भाडेतत्त्वावर दिलेले डम्पर व एक्झिक्युटर मशिनच्या भाडेपोटीची रक्कम कल्याणच्या ठेकेदाराने थकविली. (25 lakh fine for non cashing of cheques for lease Damper Executor Machine punishable 1 day jail nashik news)

तडजोडीअंती दिलेला १७ लाखांचा धनादेश न वटल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने कल्याणच्या ठेकेदारास २५ लाखांचा दंड व एका दिवसाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. पीडित गांधी यांना तब्बल १२ वर्षांनी नुकसान भरपाई न्यायालयाच्या माध्यमातून मिळाला आहे.

दीपक बंडू लोखंडे असे शिक्षा व दंड ठोठावण्यात आलेल्या कल्याण येथील ठेकेदाराचे नाव आहे. नाशिकमधील बालाजी अर्थ मुव्हर्सचे शशिकांत कोमिनीनी गांधी (रा.गोविंदनगर, नाशिक) यांनी लोखंडे यास डम्पर, टाटा हिटाची एक्झिक्युटर मशिन भाडेतत्त्वावर दिले होते. तसा करार होऊन त्यानुसार लोखंडे याच्याकडे ३१ लाख ९ हजार २७८ रुपये थकीत झाले होते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

25 lakh fine for non cashing of cheques for lease Damper  Executor Machine
NMC News : नाशिककर नवीन करांमध्ये अडकणार! सर्व व्यवस्थांमध्ये 5 ते 10 पटीने वाढ

पाठपुरावा करूनही ते वसुल होत नव्हते. त्यामुळे तडजोडीअंती १७ लाख ५० हजार ९२८ रुपयांचा धनादेश गांधी यांच्या फर्मच्या नावे दिला. परंतु सदरचा चेक न वटल्याने गांधी यांनी २०१२ मध्ये लोखंडे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. सदरील खटल्याचे कामकाज अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जी.एच. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली.

यावेळी गांधी यांच्या वतीने ॲड. राहुल पाटील यांनी बाजु मांडली. त्यानुसार गेल्या ४ तारखेला न्यायालयाने ठेकेदार लोखंडे यास एका दिवसाचा साधा कारावास, व २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साध्या कारावाजी शिक्षा सुनावली. दंडाच्या २५ लाखांपैकी २४ लाख गांधी यांना देण्याचे आदेशही दिले.

25 lakh fine for non cashing of cheques for lease Damper  Executor Machine
Congress News : शहराध्यक्षांविरोधात पुन्हा समांतर काँग्रेस; निवडीनंतरही गटबाजीचे ग्रहण कायम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com