मनमाडला लोकअदालतीत 261 प्रकरणे निकाली; 37 लाखांची वसुली

Court
Courteakal

मनमाड (जि. नाशिक) : मनमाड न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये एकूण ३२४७ पैकी २६१ प्रकरणांचा निपटारा करून ६६ लाख ४६ हजार ३८४ रूपये वसुल करण्यात आले. त्यामध्ये दाखलपूर्व २७६६ प्रकरणांपैकी १६५ प्रकरणांचा निकाल लावण्यात येवून २९ लाख ४१ हजार ५०५ रूपये तर प्रलंबित ४६१ प्रकरणांपैकी ९६ प्रकरणांचा निकाल होवून ३७ लाख ४ हजार ८७९ रूपये वसुल करण्यात आले.

मनमाड न्यायालयात ज्युडीशियल मॅजिस्ट्रेट शलाका लोमटे व रेल्वेचे न्यायाधीश गणेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुधाकर मोरे, द्विसदस्यीय बेंच सदस्य अॅड. ए. के. निकम व ॲड. ए. एस. पठाण यांनी या राष्ट्रीय लोकअदालतीचे संयोजन केले. मनमाड वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र पालवे, सचिव अॅड. किशोर चोरडिया, सहसचिव अॅड. बापट, अॅड. राजेंद्र पांडे, अॅड. नासिर पठाण, अॅड. के. एस. मल्हारे, ॲड. पी. के. मुलचंदानी, ॲड. के. एस. संसारे, तसेच २१ न्यायालयीन कर्मचाऱ्यांसह बँक, नगरपालिका, पतसंस्था, ग्रामपंचायत, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

Court
अवकाळीने कांदा गडगडला; दर घसरल्याने शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

बँक व पतसंस्थांच्या दाखलपूर्व ५९५ पैकी १८ प्रकरणांचा निकाल होवून २४ लाख ७७ हजार ९५० रूपयांची वसुली झाली. गुन्हेगारी प्रकरणातील प्रलंबित २२८ प्रकरणांपैकी ३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या दाखलपूर्व ८८४ प्रकरणांमधून ६ प्रकरणे निकाली होवून ५० हजार ९१० रूपये वसुल करण्यात आले. मनमाड नगरपालिकेच्या विविध प्रलंबित कर आकारणीच्या १४१ दाखलपूर्व प्रकरणांपैकी ८ प्रकरणांचा निकाल होवून १ लाख ७४ हजार १७७ रूपये वसुल झाले. मॅट्रीमोनिअल प्रलंबित ३४ पैकी ७ प्रकरणे निकाली निघाली. तर एनआय अॅक्टच्या १३८ कलमाखालील प्रलंबित १६७ पैकी २६ प्रकरणांचा निपटारा करण्यात येवून त्यातून ३७ लाख १ हजार २९ रूपये वसुल करण्यात आले. तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमधील दाखलपूर्व ११४६ प्रकरणांपैकी १३३ चा निकाल लावण्यात येवून २ लाख ३८ हजार ४६८ रूपयांची वसुली झाली. प्रलंबित २८ पैकी ३ प्रकरणांचा निकाल झाला. इतर प्रलंबित २४ केसेसपैकी सर्व प्रकरणांचा निकाल होवून ३ हजार ८५० रूपये वसुल झाले. रेल्वे कोर्टातील १९२ गुन्हेगारी केसेसपैकी ३० केसेस निकालासाठी ठेवण्यात आल्या होत्या. परंतु, यापैकी एकाही प्रकरणाचा निकाल लागू शकला नाही.

Court
नांदगावच्या हद्दवाढीसाठी आमदार कांदेंचे नगरविकासमंत्र्यांना साकडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com