Nashik News : जप्त वाहनांचा 26 ला लिलाव

e auction
e auctionesakal

Nashik News : प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांत जप्त केलेल्या १९ वाहनांचा येत्या २६ एप्रिलला सकाळी अकराला जाहीर ई-लिलाव होणार आहे.

ई-लिलावात सहभागासाठी इच्छुकांनी २४ एप्रिलपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले आहे. (26th auction of impounded vehicles Nashik News)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

e auction
NMC News : दीड महिन्यात 2352 अनधिकृत फलक हटविले

सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात ३५ हजार रूपये रक्कमेचा आरटीओ, नाशिक या नावाने अनामत धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट)सह नोंदणी करून कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

लिलाव करण्यात येणाऱ्या १९ वाहनांत बस, मोटार, कॅब, हलके, मध्यम, अवजड मालवाहू वाहनांचा समावेश आहे.

लिलाव प्रक्रियेत जीएसटीधारकांनाच सहभाग घेता येईल. वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली अडकवून ठेवलेल्या वाहनांच्या मालकांना कर अदा करण्यासाठी त्यांच्या नोंदणीकृत पत्‍त्यावर पोच देयक टपालाने नोटीस दिली आहे. या जाहीर ई-लिलावाच्या अटी व शर्ती बुधवार (ता. १९)पासून www.eauction.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्‍या जातील.

e auction
Tathagat Mahanatya : ऐतिहासिक महानाट्याला हजारो सातपूरकरांची उपस्थिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com