Central Railway Block : मध्य रेल्वेचा आता 28 ला ब्लॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway

Central Railway Block : मध्य रेल्वेचा आता 28 ला ब्लॉक

मनमाड (जि. नाशिक) : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मनमाड-दौंड विभागातील बेलापूर, चितळी, पुणतांबा दुहेरी मार्ग यार्डच्या रीमोल्डिंग आणि एनई कामामुळे २२ व २३ मार्चला ब्लॉक घेण्यात येणार होता. (28th Block of Central Railway Nashik News)

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

मात्र तो आता पुढे ढकलण्यात आला असून २८ मार्चला घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे दहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून दहा गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत तर चार गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ऐन सणासुदीत व गर्दीच्या हंगामात अचानक ब्लॉक घेण्यात येत असल्याने रेल्वे प्रशासनाविषयी प्रवाशांमधून तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.